रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार पुन्हा मोठा ट्विस्ट; ही होणार शिर्के-पाटील कुटुंबाची नवी मालकीण

by India Darpan
जुलै 6, 2022 | 5:18 am
in मनोरंजन
0
sukh mhanje

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या टिव्हीवर काही मालिका खूपच गाजत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही विशेष गाजत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शिर्केपाटील कुटुंबात अनेक घटना घडताना दिसत आहेत. एकाच वेळी दोन जयदीप समोर उभे राहिल्यामुळे या मालिकेला एक वेगळं वळण मिळालं होते. यामध्येच आता मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. शिर्केपाटील कुटुंबात आतापर्यंत सून म्हणून राहणारी गौरी या घराची लेक असल्याचं सत्य समोर आले आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रसिद्ध मालिकेत गौरी शिर्के पाटीलची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू​ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे​. मालिकेत तिला मिळणारी वागणूक आणि यावर तिच्या सध्या सरळ व्यक्त केलेल्या भावना प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपली छाप सोडणारी गिरिजा प्रभू खऱ्या आयुष्यात एक उत्तम डान्सर आणि मॉडेल देखील आहे.

विशेष म्हणजे या मालिकेत साधी सरळ भूमिका देण्यात आली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात ती एक चांगली मॉडेल आहे. नुकताच तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.​ ​गिरजाने या अगोदर लक्ष्य, विठू माऊली, जय मल्हार, क्राईम डायरी अशा मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने अनेक लहान भूमिका केल्या नंतर सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये तिला पहिल्यांदाच प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली.

या मालिके​तील भूमिकेमुळे ती घरा​ घरात पोहोचली आहे. ​​सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने गिरिजाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. गिरिजा बद्दल बोलायचं झालं तर​ ​गिरिजा प्रभूचा जन्म २७ नोव्हेंबर २००० रोजी गोवा येथे झाला​​. तिने पीडीईएच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले​. आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये ​बॅचलर ऑफ आर्टसचे शिक्षण घेतले आहे.​ यापूर्वी तिने युवा डान्सिंग क्वीन हा ​रिऍलिटी शो देखील केला आहे. तसेच तिने कौल मनाचा, काय झालं कळणा या चित्रपटात देखील काम केले आहे. ​गिरीजा ​सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

आता या मालिकेत एकेकाळी शिर्केपाटील कुटुंबात मोलकरीण म्हणून काम करणारी गौरी जयदीपसोबत लग्न करुन या घराची सून होते. इतकंच नाही तर सून झाल्यानंतरही तिच्या अडचणी काही कमी होत नाहीत. या घरात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, आता गौरी या घराची सून नसून घरची लेक असल्याचं सत्य समोर आलं आहे. दरम्यान, जयदीप आणि गौरी यांच्या खऱ्या आई-वडिलांचं सत्य अम्मा शिर्केपाटील कुटुंबाला सांगते.

यात जयदीप सूर्यादादांचा मुलगा असून गौरी तुमची लेक असल्याचं ती सांगते. तिच्या या खुलाशामुळे घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. मात्र, माई, गौरीला तिची लेक म्हणून स्वीकारते आणि मोठ्या थाटात आपल्या लेकीचं स्वागत करते. इतकंच नाही तर ती यापुढे शिर्केपाटील कुटुंबाची मालकीण असेल असं घोषित करते. परंतु, यामध्येही शालिनी आता नवा डाव रचणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

Marathi TV Serial Sukh Mhanje Nakki Kay Aste Twist

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उधळपट्टी! पंजाबच्या आप सरकारने जाहिरातीवर खर्च केले तब्बल एवढे कोटी

Next Post

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेत शाळांना बळजबरी आठवडाभर सुट्टी; हे आहे कारण

Next Post
srilanka 2

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेत शाळांना बळजबरी आठवडाभर सुट्टी; हे आहे कारण

ताज्या बातम्या

st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
Untitled 40

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…६ जणांचा मृत्यू, २५ जण वाहून गेले

जून 15, 2025
Screenshot 20250615 152229 Collage Maker GridArt

ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश…स्थानिकांचा विरोध मावळला

जून 15, 2025
cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011