इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाजाचे रक्षणकर्ते पोलीस आहेत म्हणून आपण आपल्या घरात सुखाने झोपू शकतो. गुन्हा घडला की आपल्याला आठवण येते ती पोलिसांची. याच पोलिसांच्या कर्तृत्त्वावर प्रकाश टाकणारी, त्यांच्या अडचणी मांडणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केला. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्याची आल्याची पोस्ट अभिनेता सोहम बांदेकर याने शेअर केली आहे.
‘होम मिनिस्टर’ फेम अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या टीमबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने ही मालिका लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले आहेत. ”आज ‘नवे लक्ष्य’ या मालिकेचा शेवटचा भाग चित्रीत झाला. असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. जय दीक्षित आणि ‘नवे लक्ष्य’वर प्रेम केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद स्टार प्रवाह, अभिजीत खाडे, नरेंद्र मुधोळकर”, अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
“नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरू झाली. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला गेला. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती. तर याच मालिकेतील भूमिकेबद्दल त्याला पहिलावाहिला पुरस्कार देखील मिळाला होता.
Marathi TV Serial Soham Bandekar Post