इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्टार प्रवाह या दूरचित्रवाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. आजवरया मालिकेत अनेक नाट्य तसेच चढ-उतार घडले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांची उत्कंठा वेळोवेळी ताणली गेली आहे. आताही तसेच घडणार आहे. मालिकेतील दीपाला खरं कळणार आहे. दीपिका ही तिचीच मुलगी असल्याचे अखेर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे सत्य कळाल्यावर पुढे काय होणार याची मोठी उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
आयेशा आणि कार्तिकच्या वादानंतर आयेशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, आपण तुझे लग्न कार्तिकशी लावून देऊ असा शब्द दीपाने आयेशाला दिला होता. दुसरीकडे दीपाने असं करू नये म्हणून सौंदर्या शक्य ते प्रयत्न करत असते. आता दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे, हे तिला कळावे म्हणून सौंदर्या इनामदार एक योजना तयार करते. त्यानुसार सगळे पुरावे दीपाला मिळावे अशी व्यवस्था ती करून ठेवते. तिच्या योजनेनुसारच आता दीपाला सत्य कळणार आहे. तसेच, आपली दुसरी मुलगीही जिवंत असून ती दीपिकाच असल्याचे देखील तिला कळते.
जीवनातील सर्वात मोठे सत्य तिच्या समोर आल्याने दीपा अक्षरशः हादरली आहे. आईसमान असलेल्या व्यक्तीनेच हा प्रकार केल्याने दीपा प्रचंड संतापली आहे. मोठा धक्का तिला बसला आहे. आता चिडलेली दीपा नक्की काय करणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. परिणामी, मालिकेत मोठं वळण पाहायला मिळणार आहे. आता दीपा पुढे काय पाऊल उचलणार आणि दीपिकाच्या भविष्याबाबतीत काय निर्णय घेणार, सौदर्याचे काय होणार हे मालिकेच्या आगामी भागांमधून कळणार आहे.
https://www.instagram.com/p/CfhD8onpqza/?utm_source=ig_web_copy_link
Marathi TV Serial Rang Majha Vegala Deepa Will know truth