इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. त्यातच बऱ्याच वर्षांनी श्रेयसचे छोट्या पडद्यावर झालेले पुनरागमन हा देखील या मालिकेसाठी प्लस पॉईंट ठरला आहे. त्यामुळेच ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेत मोठा ट्विस्ट येऊ घातला आहे. मध्यंतरी या मालिकेत यश – नेहामध्ये दुरावा आला होता. आता सगळं सुरळीत झालं आहे तोच पुन्हा एक मोठा ट्विस्ट येणार आहे.
मिथिला खूप आनंदात असते आणि याच आनंदात ती आजोबांना भेटायला जाते, तर तिथे तिचा अपघात होतो. सिम्मी ही बातमी यशला सांगते आणि मिथिलाच्या अपघाताच्या बातमीने मन थाऱ्यावर नसलेल्या यशचाही अपघात होतो. त्यावेळी नेहा देखील त्याच्या सोबतच असते. त्यामुळे येणाऱ्या भागात नेमके काय होईल, याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी होती. पण, प्रेक्षकांच्याच मागणीवरून ही मालिका सुरू आहे. मात्र, तिच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1582335176184512512?s=20&t=eFbEMdMmaclmrh0wnhGaXw
Marathi TV Serial Majhi Tujhi Reshimgath Twist
Entertainment