इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेक्षकांना आवडतील अशा मालिका तयार करण्यात झी मराठी वाहिनीचा हातखंडा आहे. त्यांच्या सगळ्याच मालिका या दर्जेदार असतात. वेगळे विषय, वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि नावाजलेले कलाकार, हे त्यांच्या मलिकांचे वैशिष्ट्य. सध्या या वाहिनीवर सुरू असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका याच पठडीतली.
ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री तितीक्षा तावडे या मालिकेत ‘नेत्रा’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारते आहे. नुकतेच तिने या मालिकेतील अनुभव मुलाखतीदरम्यान शेअर केले. ‘सरस्वती’ मालिकेतून तितीक्षाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेचा अनुभव तिने या मुलाखतीत सांगितला. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नेत्राची देवीवर श्रद्धा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यावर खऱ्या आयुष्यात तुझी कोणावर श्रद्धा आहे, असा प्रश्न तितीक्षाला विचारण्यात आला.
यावर तितीक्षा म्हणते, “मी स्वामी समर्थ यांची पूजा करते. सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. त्याआधी स्वामी समर्थ हे आम्ही फक्त इतरांच्या तोंडी ऐकलं होतं. पण अक्कलकोटला गेल्यानंतर तो माझा विसावा झाला. स्वामींच्या मठात असतानाच मला माझ्या पहिल्या मालिकेसाठी म्हणजेच ‘सरस्वती’साठी कॉल आला होता. ‘सरस्वती’बरोबरच ती ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतही मुख्य भूमिकेत होती. तर तापसी पन्नूच्या ‘शाबास मिथू’ या चित्रपटातही तितीक्षा दिसली होती.
https://twitter.com/zeemarathi/status/1599757987756662784?s=20&t=aDEZx8QtqAfJG1_kCpVtQA
Marathi TV Serial Fame Titiksha Tawade Experience