इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीव्हीच्या सुरुवातीच्या काळात मराठी मालिकांचे फार प्रस्थ नव्हते. तेव्हा हिंदी मालिकांचेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य होते. मात्र आता मराठीचा विस्तार चांगलाच वाढला आहे. आणि वाहिन्यांनी मराठी प्रेक्षकांना आपल्या बाजूने वळते केले आहे. मराठी वाहिन्यांवर भरपूर प्रमाणात मराठी मालिका आहेत. प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न वाहिन्या करताना दिसतात. ‘झी मराठी’ अशाच काही वेगळ्या धाटणीच्या मालिकांसाठी ओळखली जाते. सध्या सुरू असलेली ‘नवा गडी, नवं राज्य’ ही अशीच एक मालिका.
मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. आनंदी आणि राघवची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्याहीपेक्षा नवऱ्याचे दुसरे लग्न आणि आताच्या बायकोला त्रास देणारी आधीची बायको, या मालिकेच्या कथानकामुळे प्रेक्षकांना त्याची उत्सुकता होती. पण सध्या मालिकेचे कथानक आपल्या ट्रॅकवरून भरकटल्याचे दिसते. मालिकेचं कथानक वेगळ्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या रागाचा पारा चढला असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1621428971358556162?s=20&t=8l9AptltJDZb_neUBrh_MQ
सध्या मालिकेत आनंदी आणि राघव यांच्यात जवळीक निर्माण होत आहे. सुरुवातीला घडलेल्या अनेक गोष्टी मागे सारत राघवच्या मनात आनंदीच्या प्रेमाचे अंकुर फुलत आहेत. राघवची बहीण वर्षाच्या आयुष्यात आलेल्या वादळानंतर ती परत घरी आली आहे. तर राघव आणि आनंदी यांना एकत्र आणण्यासाठी ती सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर आनंदी – राघव एकत्र येणार आहेत. दुसरीकडे राघवची पहिली बायको रमा ही भूत असल्याने आनंदी आणि राघव एकत्र येऊ नयेत, म्हणून रमा अनेक उद्योग करत असते. तिने नुकतेच केलेले उद्योग पाहता प्रेक्षक आता संतापल्याचे चित्र आहे. याबाबत सोशल मीडियावर प्रेक्षकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भुतियागिरीच्या काही मर्यादा असतात की नाही? पत्र काय लिहते…डोळ्याने आग काय विझवते ? रिक्षा काय चालवते ? पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान विनोदाच्या स्तरावर तरी दाखवा. लेखक स्वतःच कन्फ्युज दिसतोय…’, अशी कमेंट एका युझरने केली आहे. ‘रमाला कायमचा मोक्ष द्या आणि आमची सुटका करा. ती गोड आनंदी बघायला किती छान वाटतं. पण ही बया आली की टीव्हीवर काही तरी फेकून मारावं असं वाटतं,’ असं अन्य एका युजरने लिहिलं आहे. ‘खूप कंटाळवाणी सुरू आहे मालिका’ अशा वैतागवाण्या कमेंटही बघायला मिळत आहेत.
https://twitter.com/ZEE5Marathi/status/1620685885510393856?s=20&t=8l9AptltJDZb_neUBrh_MQ
‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहेत. रमाचा मृत्यू झाला आहे. पण तरीही तिचं ‘भूत’ घरात नांदत असतं. तिचा नवरा राघव दुसरं लग्न करून आनंदीला घरात आणतो. पण रमा आनंदीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करते आणि रमा फक्त आनंदीलाच दिसते. तर निर्मळ मनाची आनंदी हीने तिच्या घरच्यांसह प्रेक्षकांची देखील मने जिंकली आहेत.
https://twitter.com/zeemarathi/status/1621029098251509760?s=20&t=8l9AptltJDZb_neUBrh_MQ
Marathi TV Serial Audience Angry Story
Zee Marathi Nava Gadi Nava Rajya