पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हाधिकारी होण्यासाठी धडपडणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबातील तरुणीची कहाणी असलेल्या अप्पी आमची कलेक्टर या दूरचित्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी खुषखबर आहे. कारण, आता अप्पी खरंच कलेक्टर होणार आहे. गेल्या अनेत महिन्यांपासून ही मालिका झी मराठीवर सुरू आहे. अप्पीच्या कलेक्टर होण्यात असंख्य अडचणी आल्या. तसेच, आता ती कलेक्टर होणार की नाही, अशा शंकाही उपस्थित झाल्या. पण, आता सर्व अडथळ्यांवर मात करत अप्पी कलेक्टर होणार आहे.
येत्या रविवारी म्हणजेच, १६ एप्रिल रोजी १ तासाचा महाएपिसोड प्रसिद्ध केला जाणार आहे. याच भागामध्ये अप्पी कलेक्टर होणार आहे. याद्वारे तिच्या कुटुंबाचे आणि तिच्या परिसरातील नागरिकांचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. अतिशय लोकप्रिय असलेली ही मालिका आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. गेल्या काही भागात अप्पीची मुलाखत, तिचे प्रश्न आणि आदी बाबी दाखविण्यात आल्या. त्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. मुलाखतीत ती उत्तीर्ण झाल्याने ती कलेक्टर होते आणि यासंबंधी तिला कळविले जाते. ते जाहीर होताच तिच्या घरा परिसरात असलेले वातावरण आणि अन्य बाबी या १ तासाच्या भागात दाखविले जाणार आहे. यासंबंधीचा प्रोमो सध्या रिलीज करण्यात आला आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1646000994676011008?s=20
Marathi Tv Serial Appi Amchi Collector Special Episode