मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक आहे. आता त्यांची लोकप्रियता आणखी वाढतेय. विशेष म्हणजे ‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका महिलांची जास्त आवडती आहे, असे म्हटले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेमध्ये आलेल्या अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तसेच त्यामुळे या मालिकेला आता आणखी प्रेम मिळू लागले आहे.
मालिकेतील संजू आणि रणजीत ढालेपाटील म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. संजू तिच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी लोकप्रिय आहे. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने सातशे भागांचा टप्पा पूर्ण केला होता. ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन या मालिकेची टीम कायमच एकत्र धमाल करत असते. या मालिकेत संजीवनी ढालेपाटील अर्थात शिवानी सोनार ही अभिनेत्री सध्या बरीच लोकप्रिय होताना दिसत आहे. शिवानीने मालिकेतील दोन अभिनेत्रींसोबत धमाल करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यात सध्या ढालेपाटलांच्या तीनही सुना मिळून एकदम कमाल नृत्य करताना दिसत आहेत. शिवानीने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
यात संजूने म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने हा भन्नाट व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत. या मालिकेत ढालेपाटलांच्या सुनांचे एकमेकींसोबत फारसे पटत नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र, ऑफस्क्रीन या सगळ्यांमध्ये कमालीची बॉण्डिंग आहे. हेच मैत्रीच नाते या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानीसह श्रुती अत्रे व ऐश्वर्या शिंदे दिसून येत आहेत.
Marathi TV Serial Actress Dhale Patil Family Dance Video