इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीआरपी रेटिंगमध्ये सतत टॉप ५ मध्ये असणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते. त्यातील आपल्या ठाम भूमिकेमुळे आई म्हणजे अरुंधती ही महिलांच्या गळ्यातील ताईत ठरली आहे. महिला गृहिणी आहे म्हणजे ती त्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही या समजाला छेद देणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेत आजवर अनेक नव्या एन्ट्री झाल्या आहेत. आता अशीच एक नवी एन्ट्री या मालिकेत झाली आहे. या नव्या पाहुण्याने देशमुख कुटुंबात पुन्हा नवे वादळ येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती आता गायक म्हणून नाव मिळवत आहे. देशमुख कुटुंबापासून अरुंधती विभक्त राहात आहे. तर अरुंधतीला दूर करून संजनाशी लग्न केलेला अनिरुद्ध संजनाला वैतागला आहे. अनिरुद्ध वैतागल्याने संजनाचा मुलगा निखिल हा घर सोडून गेला होता. तर आता देशमुख कुटुंबात दहीहंडीची धूम सुरु असताना एक नवीन पाहून येणार आहे. आशुतोषचा पुतण्या अनिश याची एन्ट्री यात दाखवण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/CheW_JMBXXb/?utm_source=ig_web_copy_link
दहीहंडी सुरू असतानाच पोहोचलेला अनिश ईशाला सावरतो. त्यावरून अनिरुद्ध पुन्हा एकदा गोंधळ घालतो. त्यातच अनिश पहिल्याच भेटीत यशाचा प्रेमात पडल्याचे दिसते आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विस्ट येणार असून आता देशमुख कुटुंबात कोणतं नवीन वादळ घोंघावणारा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte New Twist
Entertainment Star Pravah