इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – हास्यजत्रेतून नवनवीन भूमिका साकारून तसेच दर्जेदार अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री नम्रता संभेराव हिने पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्यबाबत भाष्य केले आहे. आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यामध्ये सर्वांनाच खूप इंटरेस्ट असतो. नम्रताच्या इन्स्टावरील पोस्टमुळे रसिकांची ही इच्छा नक्कीच पूर्ण झाली आहे.
लग्नापूर्वी लालबाग-काळाचौकीमध्ये राहणाऱ्या नम्रता हिचा ‘हास्यजत्रा’ पर्यंतचा प्रवास तिने सांगितला आहे. याच कार्यक्रमामुळे ती प्रसिद्ध झाली आणि तिला रसिकांचे अमाप प्रेमही मिळाले. खुद्द विनोदवीर जॉनी लिवर हे देखील तिचे फॅन आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते. पोट धरून प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्रीचा जन्म सामान्य कुटुंबामध्ये झाला. चाळ संस्कृतीमध्येच ती लहानाची मोठी झाली. याबाबत तिने स्वतःच इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं.
नम्रता आपल्या आयुष्यात अनेक भूमिकांमध्ये वावरते आणि अगदी मनापासून ती हे करते. तसंच तिचं आपल्या कामावर प्रेम आहे. आणि या भूमिकाही जगून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर ती हसू फुलवते. हास्यजत्रेत नम्रता साकारत असलेले प्रत्येक पात्र उत्तम होते. हे तिला कसं जमतं यावर ती सांगते की, माझी निरीक्षणशक्ती चांगली आहे. अभिनयासाठी त्याची मला खूप मदत होते. इन्स्टा लाईव्हमध्ये एका चाहत्याने हा प्रश्न विचारला होता.
नम्रता सांगते, मी आधी चाळीमध्येच राहत होते. लालबाग-काळाचौकी या परिसरामध्येच मी वाढले. तिथे आजूबाजूच्या लोकांकडे पाहून मी माझ्या पात्रांमध्ये नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करते.” नम्रताची सगळ्यात लोकप्रिय भूमिका म्हणजे लॉली. ती सांगते की, लॉली हे पात्र साकारण्यात माझे एकटीचे कष्ट नाहीत. तर यात सचिन गोस्वामी, सचिन मोटे तसेच प्रसाद खांडेकरचा देखील तेवढेच कष्ट आहेत. नम्रताच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे.
Marathi TV Actress Namrata Sambherao Life Journey