शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक…राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हटले गेले पाहिजे

by Gautam Sancheti
जुलै 11, 2025 | 7:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक 2 1024x556 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ आदींसह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये (सीबीएसई) राज्यभाषा मराठी शिकविणे अनिवार्य आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकविणे देखील बंधनकारक आहे. सर्व शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे म्हटले गेले पाहिजे. यासोबतच मराठी भाषा, अभिजात भाषा दर्जाबाबतही प्रत्येक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे यासाठी शाळांमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू करण्यात यावा. यासाठी प्रत्येक झाडाला क्यूआर कोड देऊन, झाडांचा वाढदिवस देखील साजरा करावा. अधिकाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला एका झाडाच्या संगोपनाची जाबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी त्या झाडाची काळजी घेतील.

श्री. भुसे म्हणाले, पुढील वर्षांपासून इयत्ता चौथी आणि सातवीचे विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतील. शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध शासकीय योजनांद्वारे पायाभूत सुविधांचा विकास करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घ्याव्यात. काही शाळांबाहेरील पानटपऱ्यांवर कारवाई करावी. यासोबतच आधार, अपार आयडी पडताळणी, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आदी विषयांचाही श्री. भुसे यांना आढावा घेतला.

चर्नी रोड येथे बालभवन प्रकल्पाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना बालभवन येथे शैक्षणिक सहलीसाठी आणावे. त्यांच्यातील कलागुणांना यामुळे वाव मिळू शकतो. सोबतच कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या बालभवनचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचे अपार, आधार पडताळणी करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर लक्ष केंद्रीत करा. पीएमश्री शाळा उपक्रमात सहभागी व्हा, महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्यासाठी उपाययोजना आखा, आयडॉल शिक्षक बँक तयार करा, या आयडॉल शिक्षकांचा इतर शाळांमधील शालेय उपक्रमात सहभाग वाढवा आदी सूचना श्री. भुसे यांनी केल्या.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला असला तरी विद्यार्थ्यांची मातीशी असलेली नाळ तुटणार नाही यावरही आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शाळांमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलने, क्रीडा स्पर्धा आयोजित करा. आठवीनंतरच्या विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये पिंक रुम तयार करा, यापुढे मुलांना शालेय जीवनापासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत विचार सुरू असून, लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. शिक्षक समायोजनाबाबत आठ दिवसात अहवाल सादर करून शिक्षकांचे समायोजन करा, अशा सूचनाही भुसे यांनी केल्या. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रम, अभ्यासपद्धतींची माहिती दिली.
Marathi should be made mandatory in every school in the state.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शहापूरच्या शाळेत मुलींना मासिक पाळी तपासण्यासाठी विवस्त्र केलं…मुख्याध्यापिकेसह ८ जण गजाआड

Next Post

पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; पोट हिस्स्याची नोंदणी आता सातबारावर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Chandrashekhar Bawankule

पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; पोट हिस्स्याची नोंदणी आता सातबारावर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता, जाणून घ्या,शुक्रवार, २२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025
WhatsAppImage2025 08 21at6.51.20PM8LSK e1755791500938

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी…४ सुवर्ण आणि १ रौप्यपदकाची कमाई

ऑगस्ट 21, 2025
IMG 20250821 WA0326 1

कुंभमेळा निमित्त होणा-या विविध विकास कामाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक…

ऑगस्ट 21, 2025
20250821 195256

विशेष लेख….खाजगी जमीन भूसंपादन करतांना सरकारी यंत्रणेस या सात गोष्टी पाळणे बंधनकारक, नाही तर भूसंपादन होते बेकायदेशीर

ऑगस्ट 21, 2025
mahavitarn

नाशिकमध्ये या परिसरात वीजपुरवठा शनिवारी राहणार बंद…नवीन विद्युत उपकेंद्र वाहिनी जोडणीचे कार्य

ऑगस्ट 21, 2025
Gyy4 pSWYAAjtUr e1755777906342

खासदार सुनेत्रा अजित पवार संघाच्या कार्यक्रमात…वेगवेगळ्या प्रतिक्रियेनंतर दिले स्पष्टीकरण

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011