नाशिक – येथे ३ ते ५ डिसेंबर दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवसीय झालेल्या या संमेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातून विविध मान्यवर आले. याच संमेलनात मात्र, मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून ते स्पष्ट झाले आहे.
आयुक्त कैलास जाधव व अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका सुरेश खाडे यांचे आदेशाने डॉ आवेश पलोड़ संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, महेंद्रकुमार पगारे विभागीय अधिकारी व संजय दराडे विभागीय स्वछता निरीक्षक यांचे उपस्थितीत हा घनकचरा गोळा करण्यात आला. साहित्य संमेलन स्थळी व बाह्य रस्ते, परिसराची स्वछता करण्याकरिता ६० स्वच्छता कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार साहित्य संमेलन स्थळी स्वछतेचे नियोजन करुन स्वच्छता अबाधित राखण्यात आली. साहित्य संमेलन ठिकाणी चार दिवसात स्वच्छ केलेला ७ टन ९७५ किलो ओला व सुका कचरा घंटागाडी मार्फत संकलित करण्यात आला आहे.
साहित्य संमेलन ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कचरा संकलन साठी एक मोठी घंटागाडी व दोन छोटे वाहन, नागरिकांकरिता ३ मोबाइल टॉयलेट,शौचालय स्वछतेसाठी एक प्रेशर टँकर , मैला वाहतुकीसाठी एक व्हॅक्युम एम्टीएर इत्यादि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सदर साहित्य संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी विविध विभागातील डॉ बापूसाहेब नागरगोजे वैद्यकीय अधिकारी, बाजीराव माळी कार्यकारी अभियंता, श्री एस एम चव्हाणके कार्यकारी अभियंता,डॉ राजेन्द्र त्र्यंबके मलेरिया विभाग,एस.के.बैरागी अग्निशमन दल प्रमुख, प्रकाश निकम उपअभियंता बांधकाम विभाग,आर जी चव्हाण उपअभियंता पाणीपुरवठा,रवींद्र धारणकर,डॉ विजय देवकर नोडल अधिकारी,संजय दराडे घनकचरा व्यवस्थापन विभाग,डॉ श्री प्रमोद सोनवणे पशु वैद्यकीय विभाग,नितीन गंभीरे जनसंपर्क अधिकारी,वसंत ढुमसे उद्यान अधिक्षक, नवनीत भामरे बांधकाम विभाग, कैलास पांगरकर मलेरिया विभाग आदींनी परिश्रम घेतले.