इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बरेच दिवसांनी किंवा वर्षांनी बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. एका मराठमोळ्या चित्रपटाने प्रेक्षकांनाच नव्हे तर बॉलीवूडमधील कलाकारांना सुद्धा वेड लावल्याचे सोशल मीडियावरील रीलमधून दिसते. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. आता ‘वेड’ चित्रपटाच्या टीमने चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. रितेशने एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत प्रेक्षकांना सांगितलं.
अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन ‘वेड’ चित्रपटाच्या एक्सटेंडेट व्हर्जनबाबत सांगितलं. तो म्हणाला की, “चित्रपटाला तुम्ही सर्वांनी भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मी आणि टीम ‘वेड’ तुमचे आभार मानतो. आम्ही जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन करत होतो तेव्हा अनेकांनी आम्हाला सत्या आणि श्रावणीच्या रोमँटिक गाण्याबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर आम्हाला वाटलं की, अजूनही वेळ गेली नाही आपण नवं गाणं रेकॉर्ड करुन चित्रपटात वापरु शकतो. आणि आता आम्ही ‘वेड तुझे’ हे गाणं सत्या आणि श्रावणीवर शूट केलं आहे. तुमच्या आवडत्या पात्रांचं हे गाणं तुम्हाला २० तारखेपासून चित्रपगृहात पाहता येणार आहे आहे.
रितेश पुढे म्हणाला की, ‘काही लोक आम्हाला म्हणत होते की, सलमान भाऊचं गाणं चित्रपटाच्या शेवटी आहे, ते चित्रपटाच्या मध्यावर असलं पाहिजे. प्रेक्षकांची ही इच्छा देखील आम्ही पूर्ण केली असून आता हे गाणं चित्रपटाच्या मध्ये आहे. सत्या आणि त्याचे वडील, श्रावणी आणि अशोक मामा यांचे काही नवे सीन्स देखील चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच तुम्ही ‘वेड’ या चित्रपटाचं एक्सटेंडेट व्हर्जन चित्रपट गृहात पाहू शकता.
https://www.instagram.com/reel/CnjEU20h794/?utm_source=ig_web_copy_link
‘वेड’ या चित्रपटामधील ‘वेड लागलंय’, ‘सुख कळले’, ‘बेसुरी’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात रितेश आणि जेनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
https://twitter.com/ReviewBollywoo1/status/1616283864296742914?s=20&t=2QVUm3Ni4BIjyRi6GCx0rw
Marathi Movie Ved Big Changes Record Break Collection