मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला तुफान प्रतिसाद… कमाईचा आकडा देखील भारी

by Gautam Sancheti
जुलै 8, 2023 | 3:48 pm
in मनोरंजन
0
bai pan bhari

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वेगळ्या विषयांचे चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे ओळखले जातात. या वर्षात ‘महाराष्ट्र शाहीर’ नंतर त्यांचा सलग दुसरा चित्रपट आला आणि तो देखील चांगलाच हिट झाला. सहा दिग्गज अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि लगेचच हिट झाला. लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिला, परिणामी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई झाली.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटात बायकांनी एकत्र येत जी काही धमाल केली आहे ती पडद्यावर पाहणे प्रेक्षकांना चांगलेच भावते आहे. म्हणूनच ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने एका आठवड्यातच तब्बल साडे बारा कोटींचा गल्ला जमवला आहे. केदार शिंदे यांनी स्वतःच पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यातील सर्व महिलांचे आभार मानले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ ३० जून रोजी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने १ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर विकेंडला ३ दिवसांत ६ कोटी रुपये कमावत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बायकांचे आयुष्य अनुभवणे आणि तेच चित्रपटात जगणे याची संधी घेत या अभिनेत्रींनी हा चित्रपट चांगलाच गाजवला आहे. विशेष म्हणजे केवळ बायकाच नाही तर संपूर्ण कुटुंब पाहू शकतं, असा हा चित्रपट आहे. सिनेमात दाखवण्यात आलेल्या या बायकांची कहाणी प्रत्येकाला आपलीच कहाणी वाटत आहे. त्यामुळे थिएटरमध्ये महिलांची एकच गर्दी होत आहे. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे.

काय आहे गोष्ट?
या सर्व सहाजणी ‘काकडे सिस्टर्स’ असून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. सख्ख्या बहिणी असूनही स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी सगळ्या एकत्र भेटतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्यांचे स्वतःचे आपापसातील काही लहानपणापासूनचे वाद आहेत. त्याचीही झलक यात दिसते. मंगळागौर स्पर्धेसाठी सहा बहिणी एकत्र येतात आणि पुढे काय धम्माल होते हे सिनेमात दाखवलं आहे. एकंदरच उत्तम पटकथा, कमाल दिग्दर्शन, गाणी आणि अफलातून अभिनय यामुळे सिनेमा सरळ मनाला भिडताना दिसतो.

केदार शिंदेंची पोस्ट काय?
‘माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशीर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई… सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या… मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे. या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिद्धिविनायकाचा महाप्रसाद…’ अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.

प्रेक्षकांचे आभार
या चित्रपटाने पहिल्या दिवशी एक ते दीड कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.१० कोटी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.८० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता. केदार शिंदे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरूनही प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत इतरांना हा चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार यांची येवल्यातील सभा सुरू…. भुजबळांविषयी काय बोलणार… बघा, या सभेचे थेट प्रक्षेपण (व्हिडिओ)

Next Post

भुजबळांच्या भाषणातील ‘बडवे’ कोण? विठ्ठल मंदिरातील बडवे कोण? बडव्यांचा इतिहास नेमका काय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
pandharpur vithhal

भुजबळांच्या भाषणातील 'बडवे' कोण? विठ्ठल मंदिरातील बडवे कोण? बडव्यांचा इतिहास नेमका काय?

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011