इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठीतील वेगळे विषय, विषय हाताळण्याची वेगळी पद्धत यांमुळे अलीकडे मराठी चित्रपटांना देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग लाभतो आहे. पठडीबाहेरचा विचार करणारे काही दिग्दर्शक आहेत, ज्यांची विषय हाताळण्याची पद्धत प्रेक्षकांना चांगलीच भावते. केदार शिंदे, नागराज मंजुळे हे त्यापैकी काहीजण. केदार शिंदे यांचा या वर्षात सलग दुसरा चित्रपट आला, आणि तो देखील हिट झाला. त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या त्यातील एका गाण्याची विशेष चर्चा सुरू आहे. आणि या गाण्याच्या निमित्ताने एका मोठ्या व्यक्तीचे या चित्रपटाशी असलेले कनेक्शनही समोर आले आहे.
कोणते आहे खास गाणे?
या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या दिग्गज अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या दमदार अभिनयाने हा चित्रपट चांगलाच सजला आहे. चित्रपटातील गाणी, डायलॉग सर्वत्र चर्चेत आहेत. यासोबतच चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील एका गाण्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच चित्रपटाच्या दिग्दर्शकांना या गाण्याच्या गायिकेसाठी स्पेशल पोस्ट केली आहे.
काय आहे केदार शिंदेंची पोस्ट?
‘बाईपण भारी देवा’मध्ये खरंतर चार गाणी. त्यातलं टायटल आणि पिंगा ही कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅड सॅांग आहे. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. “उघड्या पुन्हा जाहाल्या”. नवं गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी . कमाल गायलय.
आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच.. आणि… शेवटचं गाणं. “मंगळागौर” ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र collage करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण सिनेमात ते गाणं ३-४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र कम्माल गायली आहे. त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटर मध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे, असं केदार शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
बख्खळ कमाई
या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.