नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर तथा कुसूमाग्रज यांच्या जन्मगावी शिरवाडे वणी येथे जिल्हा शिवसेनेच्या वतीने यंदा मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहे.सदर कार्यक्रम हा सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे होणार असून या कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री नामदार दीपक केसरकर,पालकमंत्री नामदार दादाजी भुसे, शिवसेनेचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह महाराष्ट्रातील हास्यजत्रा या प्रसिद्ध मालिकेतील कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.सदर कार्यक्रम कल्याण -डोबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून होत आहे.
निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी हे कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर तथा कुसूमाग्रज यांचे जन्मस्थान आहे.शिरवाडे वणी येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त अनेक वर्षांपासून कार्यक्रम होतच असतात.परंतु यंदा शिवसेनेच्या वतीने शिरवाडे वणी येथील मराठी शाळेत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.आपले कुसूमाग्रज या संकल्पनेतून उत्सव भाषेचा,भाषा उत्सवाची या मथळाखाली शिरवाडे वणी येथे विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर,जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे,शिवसेनेचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात येणार आहे.सुरुवातीला गावातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
या दिंडीत गावातील तसेच पंचक्रोशीतील रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.त्यानंतर हास्यजत्रेतील श्रमेश,शमिष्ठा, चेतना भट,शाम राजपूत तसेच चेतन वडनेरे, सुहास परांजपे, चिन्मय उदगीरकर आदी कलाकारांकडून कविता,गाणी,स्कीट आणि पोवाडा सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या जिल्हा शाखेने दिली आहे.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे,संपर्कप्रमुख जयंत साठे,संजय च०हाण,सहसंपर्क प्रमुख राजूआण्णा लवटे,मा.आमदार काशिनाथ मेगांळ,राजेंद्र सोनवणे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे,अनिल ढिकले, किरण देवरे, संजय दुसाणे आदी मान्यवरांनी केले आहे.
Marathi Day Hasyajatra Fame Celebrity in Shirvade Vani