इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे यांची ओळख आहे. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक सामाजिक गोष्टींवर ते भाष्य करताना दिसतात. सध्या ते त्यांच्या अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आहेत.
दिवाळी तोंडावर आली आहे. आणि तरीही हवामान विभागाकडून सातत्याने पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. नुकताच हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट दिला आहे. यानंतरच केदार शिंदे यांनी ही पोस्ट केली आहे. यात त्यांनी थेट वरूण राजालाच साकडे घातले आहे. सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतकऱ्याला. आता परतीचा पाऊसही त्यांना रडवतो आहे. याच पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांनी ही पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टसोबत केदार शिंदे यांनी आपला फोनवर बोलतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये लिहितात, अहो वरुणराजा, आता बास करा की. आधीच दोन अडीच वर्षात कोरोनाने सर्वसामान्यांची परिस्थिती बिकट केली आहे. यामुळे महागाई झाली आहे. त्यात तुम्ही रोज हजेरी लावून सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरता आहात. त्या – त्या सीझनला झालेल्या गोष्टी चांगल्या असतात. पाऊस हवा आहेच, पण तो आता दिवाळीत नको आणि पुढच्या महिन्यातही नको, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. मराठी नाट्यभूमी, मालिका आणि सिनेमा या सगळ्या क्षेत्रात केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सामान्य माणसासाठी जिव्हाळ्याचे असलेले विषय शिंदे नेहमीच आपल्या कलाकृतीतून मांडतात.
https://www.instagram.com/p/CjuIfW0Kk7G/?utm_source=ig_web_copy_link
Marathi Cinema Director Kedar Shinde Post