रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्य मराठी चित्रपट पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न…या कलाकारांचा झाला सन्मान

by Gautam Sancheti
ऑगस्ट 6, 2025 | 6:54 am
in मुख्य बातमी
0
4 1024x773 1

 

1 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना, तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री काजोल यांना सन्मानित करण्यात आले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने ज्येष्ठ गझलगायक भिमराव पांचाळे यांचा, तर छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराने युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांचा गौरव

मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार व पारितोषिकांच्या वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मंगळवारी मुंबईतील डोम एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच सन २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

2

यावेळी महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, तसेच सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह चित्रकर्मी, चित्रपटरसिक आणि माध्यमकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन २०२२ व सन २०२३ मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कार्यगटांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच यावर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मानांकन मिळाल्याबद्दल राज्य शासनाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराने यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघास सन्मानित करण्यात आले.

3 1
4
1 1
6
7

60 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार –  2022

1. उत्कृष्ट कला दिग्दर्शन – महेश कुडाळकर (उनाड)

2. उत्कृष्ट छायालेखन – अभ‍िजीत चौधरी  / ओंकार बर्वे (4 ब्लाईन्ड मेन) व प्रियषंकर गोष (ह्या गोष्टीला नावच नाही)

3. उत्कृष्ट संकलन – एस सुर्वे – (काटा कीर्रर्र)

4. उत्कृष्ट ध्वनिमुद्रण – सुहाश किशोर राणे   (ह्या गोष्टीला नावच नाही)

5. उत्कृष्ट ध्वनिसंयोजन – लोचन प्रताप कानव‍िंदे –  हर हर महादेव

6. उत्कृष्ट वेशभूषा –  उज्वला स‍िंग – ताठकणा

7. उत्कृष्ट रंगभूषा – सुमेध जाधव / सौरभ कापडे – ताठकणा

8. उत्कृष्ट बालकलाकार – श्रीन‍िवास पोकळे (छुमंतर) / अर्नव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय)

9. सर्वोत्कृष्ट कथा – सुमीत तांबे (समायरा)

10. उत्कृष्ट पटकथा – तेजस मोडक – सच‍िन कुंडळकर (पॉन्डीचेरी)

11. उत्कृष्ट संवाद – प्रव‍िण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

12. उत्कृष्ट गीते – अभ‍िषेक खणकर – (अनन्या – गाणे – ढगा आड या )

13. उत्कृष्ट पार्श्वसंगीत – हनी सातमकर (आतूर)

14. उत्कृष्ट पार्श्वगायक – मन‍िष राजग‍िरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गाणे – भेटला व‍िठ्ठल माझा)

15. उत्कृष्ट पार्श्वगायिका (विभागून) – आर्या आंबेकर (चंद्रमुखी) व अम‍ित घुगरी (सोयर‍िक)

16. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे – गाणे – आई जगदंबे)

17. उत्कृष्ट संगीत – न‍िहार शेंबेकर (समायरा)

18. सहाय्यक अभिनेता – योगेश सोमण – (अनन्या)

19. सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

20. उत्कृष्ट विनोदी अभिनेता – संजय नार्वेकर (टाईमपास 3)

21. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – जयदीप कोडोलीकर (ह्या गोष्टीला नावच नाही)

22. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री –  ऋता दुर्गुळे (अनन्या)

23. उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता खानव‍िलकर (चंद्रमुखी) सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)

24. उत्कृष्ट  अभिनेता – प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

25. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – झेन‍िथ फ‍िल्मस् (आतूर)

26. प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – प्रताप फड (अनन्या)

27. सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट – समायरा

28. सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक – ऋषी देशपांडे

29. ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – गाभ

30. ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट  दिग्दर्शक – अनुप जत्राटकर

31. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.1 – धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे

32. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.1 – प्रव‍िण तरडे

33. उत्कृष्ट चित्रपट क्र.2 – पॉन्डीचेरी

34. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक क्र.2 – सचिन कुंडलकर

35. उत्कृष्ट चित्रपट क्र.3 – हर हर महादेव

36. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक क्र.3 – अभ‍िजीत देशपांडे

६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे मानकरी

(1) उत्कृष्ट कला दिग्दर्शन –  अमेय भालेराव (श्यामची आई)

(2) उत्कृष्ट छायालेखन – जिप्सी (प्रवीण सोनवणे)

(3) उत्कृष्ट संकलन – जिप्सी (अक्षय शिंदे)

(4) उत्कृष्ट ध्वनीमुद्रण – कुणाल लोळसुरे (श्यामची आई)

(5) उत्कृष्ट ध्वनीसंयोजन – विकास खंदारे (जिप्सी)

(6) उत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे (जग्गु आणि ज्युलिएट)

(7) उत्कृष्ट रंगभूषा- हमीद शेख व मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस)\

(8) उत्कृष्ट बालकलाकार (विभागून) – कबीर खंदारे व त्रिशा ठोसर (नाळ २)

(9) उत्कृष्ट कथा – सुधाकर रेड्डी (नाळ २)

(10) उत्कृष्ट पटकथा – शशी चंद्रकांत खंदारे (जिप्सी)

(11) उत्कृष्ट संवाद – अंबर हडप व गणेश पंडित (जग्गु आणि ज्युलिएट)

(12) उत्कृष्ट गीते – वैभव देशमुख (नाळ २ – गरगरा भिंगोरी)

(13) उत्कृष्ट पार्श्वसंगीत – अद्वैत नेमळेकर (नाळ २)

(14) उत्कृष्ट पार्श्वगायक – मोहीत चौहान (घर, बंदूक, बिर्याणी)

(15) उत्कृष्ट पार्श्वगायिका – ऋचा बोंद्रे (श्यामची आई)

(16) उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – राहुल ठोंबरे व संजीर हाउलदार (जग्गु आणि ज्युलिएट)

(17) उत्कृष्ट संगीत – अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)

(18) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – संतोष जुवेकर (रावरंभा)

(19) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उषा नाईक (आशा)

(20) उत्कृष्ट विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये (जग्गु आणि ज्युलिएट)

(21) उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – निर्मिती सावंत (झिम्मा २)

(22) उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – दीपक जोइल (भेरा)उत्कृष्ट

(23) प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) – श्रद्धा खानोलकर (भेरा) आणि गौरी देशपांडे (श्यामची आई)

(24) उत्कृष्ट अभिनेता – अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट)

(25) उत्कृष्ट अभिनेत्री – रिंकू राजगुरू (आशा)

(26) उत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – आशिष बेंडे (आत्मपम्फ्लेट)

(27) उत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी)

(28) उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट -आशा

(29) उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – दीपक पाटील

(30) उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – जिप्सी

(31) उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – शशी खंदारे

(32) सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक १ – भेरा

(33) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर भि़डे

(34) उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ – जग्गु आणि ज्युलिएट

(35) उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक २ – महेश लिमये

(36) उत्कृष्ट चित्रपट क्रमांक ३ – नाळ २

(37) उत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक ३ – सुधाकर व्यंकटी रेड्डी

(38) विशेष बालकलाकार सन्मान – भार्गव जगताप (नाळ २)

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्यामची आई या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

३६ हजाराच्या लाच प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारीसह दोन जण एसीबीच्या जाळ्यात

Next Post

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाला नवे वळण….ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा या संस्थेने केला दावा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manoj jarange
संमिश्र वार्ता

कधीपर्यंत भाजपची री ओढणार…राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांची टीका

ऑगस्ट 31, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 30, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली आणखी एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 30, 2025
udhav 11
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन…दीड ते दोन मिनिट चर्चा

ऑगस्ट 30, 2025
Gzl81fKWwAE3m6S 1920x1091 1
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन….

ऑगस्ट 30, 2025
Untitled 49
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीने घेतली भेट…झाली ही चर्चा

ऑगस्ट 30, 2025
crime1
क्राईम डायरी

जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तरुण जखमी…गुन्हा दाखल

ऑगस्ट 30, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑगस्ट 30, 2025
Next Post
Untitled 62

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाला नवे वळण....ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा या संस्थेने केला दावा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011