इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे चर्चेत आलेली दबंग अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही सध्या भडकली आहे. मीरा जगन्नाथबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असल्याचे तिचे म्हणणे आहे. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याचे अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. या पोस्टद्वारे तिच्याबाबत घाणेरड्या अफवा पसरवणाऱ्यांना तिने चांगलंच सुनावलं आहे.
सोशल मीडियावर एखाद्या विषयी घाणेरड्या अफवा पसरवून त्यांच्या विषयी लोकांना चुकीची माहिती देणे आणि पर्यायाने त्यांची मानहानी करणे हा कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहे. हे समाजकंटक माझ्या विरोधात आहेत. आपल्याला अशा पद्धतीचे काही मेसेज किंवा पोस्ट दिसल्या तर कृपया अकाऊंट रिपोर्ट किंवा ब्लॉक करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलीस तसेच सायबर पोलीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लवकरच गुन्हेगार पकडले जातील.” असे मीराने पोस्टद्वारे म्हटले आहे.
सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म प्रसिद्ध होण्याचे मोठे ठिकाण असले तरी काहींना या प्लॅटफॉर्मचा असा त्रासही होत असल्याचे दिसते आहे. मीराच्या या पोस्टवरून तिच्याबाबत घाणेरड्या अफवा पसरवल्या जात असल्याने तिला मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच गप्प न बसता अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवण्याचं मीराने ठरवलं आहे.
Marathi Big Boss Mira Jagannath Complaint
TV Reality Show Entertainment