रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी…नाशिक ग्रंथोत्सवाचेही उदघाटन

by India Darpan
फेब्रुवारी 27, 2025 | 3:46 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250227 WA0442 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग जि.प., जिल्हा ग्रंथालय संघ, व सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या सहकार्याने मराठी भाषा गौरव दिन व नाशिक ग्रंथोत्सव २०२४ चे आज सकाळी उदघाटन करण्यात आले. ग्रंथोत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहे.

मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, अविनाश येवले, ‘सावाना’चे कार्याध्यक्ष ॲड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, बालभवनप्रमुख सोमनाथ मुठाळ यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

खासदार श्री. भगरे म्हणाले, वाचनाची आवड निर्माण व्हावी व मराठी भाषेचा जागर होवून व्याप्ती वाढावी यासाठी दरवर्षी नाशिक येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचकांना एकाच छताखाली साहित्यकांची साहित्य, ग्रंथ आदी उपलब्ध होणार आहेत. यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे. ग्रंथोत्सवासारखे उत्सव जिल्ह्यातील विविध तालुक्यात आयोजित केल्यास वाचक मोठया प्रमाणात वाढून वाचन संस्कृती वाढविण्यास मदत होईल.

प्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी 75 वर्ष पूर्ण झालेले ग्रंथालय व ग्रंथमित्रांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. तरुण वर्गाला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. तरुण वर्गाला वाचन संस्कृतीमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले व मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी
तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून मराठीचा जागर केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे- वणी कवितांचे गाव म्हणून घोषित

Next Post

बँक फसवणूक प्रकरणात इंडियन बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह या आरोपींना ५-७ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा…९३ लाख रुपये दंड

India Darpan

Next Post
cbi

बँक फसवणूक प्रकरणात इंडियन बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह या आरोपींना ५-७ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा…९३ लाख रुपये दंड

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011