इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा राणीची जोडी’ मालिकेमधील संजूची रांगडी भूमिका सर्वांच्या चांगलीच लक्षात आहे. संजीवनी पंजाबराव बांदल ते संजीवनी रणजित ढालेपाटील या प्रवासात प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील पात्रांवर प्रेक्षकांचे आजही नितांत प्रेम आहे. या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनारने आपल्या हसतमुख आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. नुकतंच शिवानीने सहकुटुंब साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रुंगी मातेचे दर्शन घेतले. मातेच्या चरणी नतमस्तक झाल्याचे तिचे फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
इतर अभिनेत्रींप्रमाणे शिवानी देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने शिवानी अभिनय क्षेत्राकडे वळाली. शिवानी आणि तिने पडद्यावर साकारलेली संजीवनी ही व्यक्तिरेखा यात फार काही फरक नाही. शिवानी देखील संजीवनीसारखीच बिनधास्त आहे. रंगभूमीवरून शिवानीने आपला प्रवास सुरू केला असला तरी शिवानी उच्चशिक्षित आहे. यासोबतच ती उत्तम नर्तिका आणि मेकअप आर्टिस्ट देखील आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘गर्जा महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिला ‘राजा राणीची जोडी’ ही मालिका मिळाली आणि महाराष्ट्रातल्या घराघरात शिवानी पोहचली. या मालिकेतील तिचं ‘टॉक’ भलतंच प्रसिद्ध झाल होत.
दरम्यान, शिवानी सोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकार आणि नवविवाहित जोडपं हार्दिक – अक्षया यांनीदेखील देवीचं दर्शन घेतलं आहे. याचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/Cl_NspMJxY0/?utm_source=ig_web_copy_link
Marathi Actress Shivani Sonar Saptashrungi Devi Darshan
Entertainment