इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून अभिनेत्री शिल्पा तुळसकरने पुन्हा मनोरंजन विश्वात कमबॅक केलं. तिने यापूर्वीही चित्रपटसृष्टी तसेच छोटा पडदाही आपल्या अभिनयाने गाजवला आहे. सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या माध्यमातून शिल्पा घराघरात पोहचली आहे. ही मालिका तिच्या अल्पवधीत मिळालेल्या यशाची मानकरी ठरली आहे. तर मालिकेतील अनामिका म्हणजेच शिल्पा तुळसकरने आपल्या खासगी आयुष्यात घडलेला तो किस्सा उघड केला आहे.
अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा प्रेमविवाह झाला आहे. तिच्या वैवाहिक आयुष्यात ती खुश आहे. दिलखुलास जगणाऱ्या शिल्पाने तिच्या खासगी आयुष्याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ती म्हणाली, मी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते तेव्हा फिल्म इन्स्टीट्युटची एक डिप्लोमा फिल्म मी केली होती. मला महाविद्यालयातील कोणता मित्र आवडला नाही. पण या क्षेत्रामध्ये खूप कमी लोकांकडे पाहून मला असं वाटलं की यांच्याशी लग्न झालं असतं तर मला आवडलं असतं, असं ती म्हणाली.
शिल्पा पुढे म्हणाली की, ”फिल्म इन्स्टीट्युटची डिप्लोमा फिल्म जेव्हा मी करत होते तेव्हा तिथला डीओपी मला खूप आवडला होता. त्याने चित्रीकरणादरम्यान लावलेली प्रत्येक फ्रेम छान दिसत होती. त्या फ्रेममध्येच मी होते. मीही सुंदर दिसत होते. एक गोंधळ तेव्हा मी घातला. त्यात डीओपीची आणि माझी छान मैत्री झाली होती. पुढे शिल्पा म्हणाली, “मला कळलं होतं की त्याला मी आवडते आहे. मलाही तो आवडायचा. पण हे मी त्याला सांगितलं नाही. कारण मला बॉयफ्रेंड होता. मी कोणाला तरी डेट करत आहे, हेही मी त्याला सांगितलं नाही. कारण मला ती मैत्री गमवायची नव्हती. पण शेवटी एक वेळ अशी आली की त्यानेच मला प्रपोज केलं. त्यावेळी माझा बॉयफ्रेंड आहे हे मला त्याला सांगावं लागलं. तेव्हा आमची मैत्री तुटली. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही पुन्हा याच क्षेत्रात काम करत असताना भेटलो. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा खूप गंमतीने या विषयावर बोललो. पण मी त्याचं मन तेव्हा दुखावलं. आजही मला त्या गोष्टीचं दुःख वाटत असल्याचे शिल्पाने सांगितले.
Marathi Actress Shilpa Tulaskar on Boyfriend and Past
Entertainment TV Show Film