शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अखेर अभिनेत्री सायली संजीवने सोडले मौन; रिलेशनशिपबद्दल केले हे भाष्य

डिसेंबर 6, 2022 | 5:06 am
in मनोरंजन
0
Sayali Sanjiv e1670247997143

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची धूम आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात ७ षटकार लगावले. असे ७ षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने दुहेरी शतकही झळकावले. ऋतुराज गायकवाडने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आणखी एका कारणासाठी देखील ऋतुराज काही काळापासून चर्चेत आहे. ते म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. काही महिन्यांपूर्वीच सायली संजीवने आपल्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते.

सायली संजीवला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा आयपीएलपासून रंगल्या आहेत. सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर ऋतुराजने कमेंट केली आणि या चर्चा सुरु झाल्या. ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला. त्यानंतरच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. काही महिन्यांपूर्वी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमावेळी सायली संजीवने यावर थेट भाष्य केले होते.

यावेळी सायलीबरोबर अभिनेता शरद केळकरही सहभागी झाला होता. या कार्यक्रमात सहभागी महिलांनी सायलीला ऋतुराजबद्दल प्रश्न विचारला. सायलीला ऋतुराजबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर शरदने तिची थट्टा करण्यास सुरुवात केली. ‘जर तो तुझा मित्र असेल तर प्लीज मला त्याच्याकडून एक बॅट हवी आहे… माझ्यासाठी एक बॅट मागून घे’ असे त्याने तिला गंमतीत म्हटले. त्यावर तिनेही ‘मी तुम्हाला बॅट मिळवून देऊ शकते’, असे म्हटले.

त्यानंतर तिने ऋतुराजसोबतच्या रिलेशनशिपबाबत सांगितले. सायली म्हणते, “मी आणि ऋतुराज फार चांगले मित्र आहोत. खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोघे तिघे माझे चांगले मित्र आहेत. त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आहे. हे सर्वजण माझे खूप चांगले मित्र आहेत. एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यांना माझी ‘काहे दिया परदेस’ ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे. मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा चकितच झाले,” असे तिने सांगितले. सायलीच्या या उत्तरानंतरही हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याबद्दल अजूनही चाहत्यांना स्पष्टता आलेली नाही. तिने मात्र यावर टाळाटाळ केली आहे.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर सायलीने आपले स्थान निर्माण केले आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारते आहे. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

https://twitter.com/SayaliSanjeev/status/1593094504705585152?s=20&t=aDEZx8QtqAfJG1_kCpVtQA

Marathi Actress Sayali Sanjiv on Relationship
Entertainment TV Show Ruturaj Gaikwad

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री दत्त परिक्रमा भाग २० : हसत खेळत,आनंदाने श्रीदत्त परिक्रमा अशी करा

Next Post

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका फेम नेत्राची यावर आहे अपार श्रद्धा; सांगितला तो अनुभव

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Satvya Mulichi1

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका फेम नेत्राची यावर आहे अपार श्रद्धा; सांगितला तो अनुभव

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011