इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने कमेंट केली आणि तिथूनच या चर्चांना सुरुवात झाली. सायलीने अनेकदा या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यानंतर ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सायलीने या चर्चांवर आपले मत व्यक्त केले होते. तेव्हाही तिने ऋतुराजसोबत असलेल्या मैत्रीचा पुनरुच्चार केला.
ऋतुराज आणि माझ्यात चांगली मैत्री आहे, असं तिने म्हटलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात काहीच नाही. मात्र, या अफवांमुळे आमच्यातील मैत्री देखील संपवली आहे. आता आम्ही मित्र म्हणूनही एकमेकांशी बोलू शकत नाही. आमच्यात काहीच नसतानाही आमचं एकमेकांशी नातं का जोडलं जातंय हे मला आजवर कळले नसल्याचे सायलीचे म्हणणे आहे.
दरम्यान, ऋतुराजसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे माझ्या खासगी आयुष्यावरही परिणाम झाल्याचं सायलीने यावेळी सांगितलं. या अफवांमुळे माझ्या खासगी आयुष्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्याचे तिने नाराजीने सांगितलं. या गोष्टी अफवा पसरवणाऱ्यांना कधीच कळत नाहीत. खरं तर ऋतुराज हा खूप चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला आम्ही एकमेकांशी बोलायचो. चर्चा होत असल्या तरी अफवा आहेत असं म्हणून आम्ही दुर्लक्ष करायचो. पण दीड वर्षानंतरही या अफवा पसरत असल्याने त्याचा मला त्रास होऊ लागला. आज जर ऋतुराजच्या एखाद्या चांगल्या कामाबद्दल मला त्याचं कौतुक करायचं असेल तर ते मी करू शकत नाही. आणि दुसरीकडे तो देखील माझ्या कामाबद्दल काहीच बोलू शकत नाही, असं सांगत मैत्रीवर वाईट परिणाम झाल्याचं सायली सांगते.
#हरहरमहादेव25oct pic.twitter.com/aULzDJyhpv
— सायली संजीव (@SayaliSanjeev) October 9, 2022
Marathi Actress Sayali Sanjeev on Ruturaj Gaikwad Affair