मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – सध्याच्या काळात अनेक बॉलीवूड कलाकार वादग्रस्त विधान करत असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः काही अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या अत्यंत खासगी अशा जीवनाबद्दल सोशल मीडियावर किंवा मुलाखतीमध्ये काही गोष्टी सांगत अथवा शेअर करत असल्याने यावर रसिक प्रेक्षक, चाहते आणि ट्रोलर्स उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत.
आता यामध्ये काही मराठी कलाकारांची देखील भर पडली आहे. काही महिन्यांपूर्वीच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आपल्या अंतर्वस्त्र म्हणजेच ब्रा संदर्भात एक खुलासा केला होता, अर्थात त्याचे महिला वर्गाकडून स्वागत करण्यात आले होते, इतकेच नव्हे तर काही पुरुष मंडळींनी देखील तिच्या या विधानाला पाठिंबा दिला होता. परंतु पुन्हा एकदा अशा एका मराठी अभिनेत्रीने मत मांडल्याने त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर होय.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस आणि बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. सई तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केल्याने ती एक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. विशेष म्हणजे सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे नुकतंच सईला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
या पुरस्कारामुळे चर्चेत असलेली सई सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. यात सई ताम्हणकरने तिच्या अंर्तवस्त्रांबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत तिने याबाबत आपले मत मांडले आहे. सई ताम्हणकरची मैत्रीण मालिनी अग्रवाल हिने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम रिल आहे. ‘तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही?’ असा प्रश्न या व्हिडीओद्वारे विचारण्यात आला आहे. त्यावर सई आणि तिची मैत्रीण एका डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसत आहेत. या प्रश्नवर सई म्हणते, ‘ अच्छा लगता है ‘ म्हणजेच ‘मला बरं वाटतं, खूप मजा येते. ‘सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
यंदाच्या आयफा पुरस्कारावर सई ताम्हणकरने तिचे नाव कोरले आहे. दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात तिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे सर्व मराठी कलाकारांना प्रेक्षकांना तिचा अभिमान वाटत आहे. मात्र आता तिच्या या नवीन व्हिडिओमुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्याविषयी देखील अशीच चर्चा सुरू होती. याला कारण म्हणजे त्या दोघींनी एका चित्रपटात बोल्ड आणि बिनधास्त सिन दिले होते.
https://www.instagram.com/reel/CeYbINLllVM/?utm_source=ig_web_copy_link