इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात अभिनयाला जितके महत्त्व आहे तितकेच दिसण्याला देखील आहे. याखेरीज प्रत्येक कलाकाराच्या अभिनयावरून एक प्रतिमा त्याच्या चाहत्यांच्या मनात बनलेली असते. त्यामुळे हे कलाकार चाहत्यांना नेहमी जवळचे, हक्काचे वाटतात. त्यामुळेच कलाकाराचे काही वेगळे वागणे लगेचच त्याच्या चाहत्यांना, नेटकऱ्यांना खटकते आणि त्यावरून मग ट्रोलिंग केले जाते. आजवर अनेकांना या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यात आता मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे देखील नाव आले आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नुकताच एक डीप नेक फोटोशूट केला होता. त्यावरून ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे कायम चर्चेत असते. अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणारी प्रार्थना तिच्या मोहक अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. प्रार्थनाचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरही प्रार्थना प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रार्थनाने नुकतंच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केलं आहे. तिने लव्हेंडर रंगाची पॅण्ट आणि त्यावर हटके टॉप परिधान करत फॅशन केली आहे. साजेसा मेकअप आणि केस मोकळे सोडून प्रार्थनाने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडीओ प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. प्रार्थनाचं हे हटके फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं नसल्याचं दिसत आहे.
प्रार्थनाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत. काहींनी प्रार्थनाच्या ड्रेसवरुन तर काहींनी तिच्या लूकवरुन तिला ट्रोल केलं आहे. एकाने तर “म्हातारी बाई दिसतेस गं तू”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “म्हातारी दिसायला लागली आहेस”, असं म्हटलं आहे. एका युजरने कमेंट करत “असे कपडे घालू करू नकोस” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “छान दिसतेस, पण नेक खूप डिप आहे”, अशी कमेंट केली आहे. पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र या मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट झाला असून ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Marathi Actress Prarthana Behere Troll in Social Media Video