इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील कलाकार हे चाहत्यांच्या अत्यंत जवळचे असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत चाहत्यांना फारच इंटरेस्ट असतो. आणि म्हणूनच बहुधा आवडत्या कलाकारांनी केलेली एखादी गोष्ट आवडली नाही तर चाहते त्यावरून बिनधास्त टीका करतात. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा अर्थात प्रार्थना बेहरे ही सध्या या अनुभवाला सामोरी जात आहे.
वेगळ्या धाटणीच्या मालिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका चाहत्यांनाच भलतीच आवडली. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना चांगलेच भावले. मालिकेतील साधीसोज्वळ नेहा अर्थातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय बोल्ड आणि बिनधास्त आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. आपले ग्लॅमरस फोटो प्रार्थना सतत शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहते आणि कलाकार भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. सध्या मात्र ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसते आहे.
प्रार्थना बेहेरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत प्रार्थनाच्या पाठीवरील टॅटू दिसतो आहे. ..सारे काही टॅटूसाठी का, अशी कमेंट त्यावर एका नेटकऱ्याने केली आहे. प्रार्थनाला टॅटूची आवड असून तिने आपल्या पाठीवर दोन टॅटू काढले आहेत.
प्रार्थनाचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. आणि यावरूनच ती ट्रोल देखील होत आहे. कॅमेऱ्यासाठी पोझ देताना तिचा बॅक टॅटू फ्लॉंट केला. ही पोस्ट पाहून काही यूजर्सनी तिला ट्रोल केले. त्यापैकी एकाने लिहिले, “असे काही उघड करण्याची गरज नाही. कारण हा तुमच्या खऱ्या प्रतिभेचा अपमान आहे.” दुसरीकडे, तिच्या काही चाहत्यांनी आवडत्या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला. तिच्या एका चाहत्याने लिहिले, ” गॉर्जियस”, तर दुसर्याने “क्वीन” अशी उपाधी दिली आहे.
दरम्यान, प्रार्थनाने २००९ मध्ये रीटा या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. २०१३ मध्ये पंजाबी मुलगी जसपिंदर कौर म्हणून ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. नुकताच तिच्या ‘माझी तुझी रेशमगाठ’ या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेत ती श्रेयस तळपदेसोबत मुख्य भूमिकेत दिसली.
Marathi Actress Prarthana Behere Troll in Social Media