इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्राजक्ता माळी ही छोट्या पडद्यावरची अत्यंत गुणी अभिनेत्री. तिचा साधा, सुंदर चेहरा आणि सहजसुंदर अभिनय तिच्या लोकप्रियतेत भर घालतात. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करायला तिला नेहमीच आवडतं. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर आलेल्या कॉमेंट्स आणि त्यावरील प्राजक्ताचं उत्तर यामुळे ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
प्राजक्ताच्या भावाचं नुकतंच लग्न झालं. या लग्नसोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. या विवाह समारंभातील तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. यात तिने हिरव्या रंगाची नऊवारी, नथ, चंद्रकोर आणि केसांत गजरा माळून पारंपरिक लूक केला होता. मुळातच सौंदर्य लाभलेली प्राजक्ता या मराठमोळ्या वेशात फारच सुरेख दिसत होती. या तिच्या लूकने तिने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत.
यातील एका चाहत्याची कॉमेंट फारच लक्षवेधी आहे. तो म्हणतो, “मी लग्न करू की नको?” प्राजक्ताने देखील या कॉमेंटवर अत्यंत मिश्किल रिप्लाय दिला आहे. “करुन टाका माझा काही भरवसा नाही”, असा रिप्लाय देत प्राजक्ताने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर चाहत्याने त्यावरही कडी करत “भरवसा नसतो तेच पहिलं लग्न करतात”, असं म्हटलं आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. मालिकांसह चित्रपटांतही काम केलं आहे. ‘रानबाजार’ या वेब सीरिजमधून प्राजक्ताने ओटीटीवर पदार्पण केलं. त्यातील तिचा बोल्ड लूक चांगलाच गाजला होता. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते.
https://twitter.com/prajaktamali/status/1591678693109563394?s=20&t=ddq2WykdT9ORIjMnh4634w
Marathi Actress Prajakta Mali Answer to Fan
Entertainment