इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी कुटुंबात जन्म झालेली आणि घरातून कलेचे बाळकडू मिळालेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताचे वडील हे कलाकार आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरचा डिप्लोमा केला असला तरी प्राजक्ताला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. तिने ही आवड केवळ जोपासलीच नाही तर त्यासाठी मनापासून मेहनत केली. त्यामुळेच तिची महाराणी येसूबाईची भूमिका लोकप्रिय झाली आणि प्राजक्ता घराघरात पोहोचली. लाखो फॉलोअर्स असलेल्या प्राजक्ताने स्वतःचे घर घेतले आहे. याबाबतचा व्हिडीओ तिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
२०१५ मध्ये ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. उत्तम अभिनयशैली आणि सुरेख चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताही चाहत्यांशी अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. आपल्या कामाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यातही उत्तम प्रगती करत आहे.
प्राजक्ताने नुकतंच एक नवीन घर घेतलं आहे. ही बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर प्राजक्ताने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेश आणि सत्यनारायणाच्या पूजेचा आहे. नुकताच तिने नवीन घरात गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली.
या व्हिडीओत प्राजक्ता स्वतः पूजा करताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “नवीन घर… गृहप्रवेश… सत्यनारायण पूजा.” तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर, तुझी अशीच प्रगती होऊ दे, अशा शुभेच्छा देखील चाहत्यांनी तिला दिल्या आहेत.
Marathi Actress Prajakta Gaikwad New Home Video
Entertainment TV Serial