इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मानसी नाईक ही अभिनयापेक्षाही तिच्या नृत्य कौशल्यामुळे जास्त ओळखली जाते. ‘बाई वाड्यावर’ आणि ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मानसी नाईकला लोकप्रियता मिळाली. सध्या ती तिच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे जास्त चर्चेत आहे. आयुष्यात कोणावर विश्वास टाकला की होणारा त्रास, लोक घेत असलेला गैरफायदा याबाबत नुकतीच तिने एक पोस्ट केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तिने आता एक पोस्ट केली आहे. यामुळे ती प्रेमात पडली आहे की काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मानसी म्हणते की, ‘देवानं सगळ्यांसाठी एक साथीदार आधीच निवडला आहे. फक्त त्या लोकांना भेटणं हे आपल्यावर सोडलं आहे, याचा मला विश्वास आहे.’ हा व्हिडीओ शेअर करत मानसी म्हणते, “लक्षात ठेवा, तुम्ही एका बक्षीसाप्रमाणे आहात… आणि नेहमीच रहाल! तुम्ही अशा व्यक्तीबरोबर असण्यास पात्र आहात जो तुमच्याकडे दररोज लॉटरी जिंकल्याप्रमाणे पाहतो. संपूर्ण जग त्याच्यासमोर असते तरीही… त्यामुळे कधीही प्रेमाची आशा सोडू नका. प्रेम वाईट नसतं. काही लोक फक्त त्याचा गैरवापर करतात, अपमान करतात, त्याला गृहीत धरतात. तुमचा प्रेमावरील विश्वास कमी होईल असं कोणालाही वागू देऊ नका. कधीकधी तुम्ही निवडलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके तुम्हाला हृदयविकाराचा झटका देऊ शकतात. त्याऐवजी त्या गोष्टी निसर्गावर सोडा, सकारात्मक व्हा. प्रेमाला तुम्हाला शोधू द्या.” मानसीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
वैयक्तिक आयुष्यात बिघाडी
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. घटस्फोटाच्या चर्चेपूर्वी ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांच्याही नात्यात दुरावा आला.
Marathi Actress Mansi Naik Post Viral