मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेत्री मानसी नाईक प्रथमच केले घटस्फोटावर भाष्य…. पोस्टमध्ये केला संपूर्ण खुलासा…

मे 27, 2023 | 5:06 am
in मनोरंजन
0
Manasi Naik e1685102538310

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. अभिनयापेक्षाही ती म्युझिक अल्बममुळेच जास्त चर्चेत असते. मानसी ही सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असते. काही दिवसांपासून ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता तिने पहिल्यांदाच याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे.

मानसीने काही दिवसांपूर्वीच पती प्रदीप खरेरा यांच्यापासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. घटस्फोटामुळे तिला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता मानसीने पहिल्यांदाच तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल पोस्ट केली आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ ला पार पडले होते. त्याआधी काही काळ ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र आता लवकरच ते विभक्त होणार आहेत.

मानसीच्या पोस्टमध्ये काय आहे?
नाती कशी असावीत, कोणत्या माणसांवर किती विश्वास टाकावा, माणसं कशी ओळखावीत अशा गोष्टी मानसीने आपल्या पोस्टमध्ये मांडल्या आहेत.
मानसी म्हणते,
“ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते, माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा पण तरीही फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं.
मग आपण उदास होऊ लागतो एवढ्या तेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे.

माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही. प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच पण त्या सगळ्या अडचणींवर कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्या सोबत उरतात ती खरी आपली माणसं ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो.

निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात तशी माणसांची निवड करत रहावी लागते. कायम सरावाने ओरिजिनल माणसं ओळखू येतात आपल्याला भले ती चुकत असतील लाखदा पण आपला हात सोडून जाणार नाहीत त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही अशी चांगली माणसंही असतात.
आपल्या आयुष्यात अनेक ती मात्र जपायला हवीत काही लोकांसाठी आपण केवळ सोय असतो ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं तो क्षण फार फार दुखरा असतो.

जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला नाही असं नाही पण कोणावर विश्वास टाकायचा कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो. माणसं जोखणं जमायलाच हवं समोरच्या माणसाचं असत्य रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते.

खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात मग तर त्यांची कीव येते अक्षरशः का वागत असतील माणसं अशी स्वतःसह इतरांना का फसवत असतील ज्यांच्याशी अगदी पटतच नाही त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं कटुता आणून खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना”, असे मानसीने म्हटले आहे.

https://www.facebook.com/officialmanasinaik/posts/804612101031026

marathi actress manasi naik on divorce

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्यापारी बांधवांना मोठा दिलासा…. सर्व समस्या सुटणार…. राज्यपालांनी केली ही घोषणा

Next Post

ऑनलाइन लग्न लावून देणाऱ्या गुरुजींची लॉटरी; दक्षिणेपोटी मिळाली तब्बल एवढी रक्कम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

ऑनलाइन लग्न लावून देणाऱ्या गुरुजींची लॉटरी; दक्षिणेपोटी मिळाली तब्बल एवढी रक्कम

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011