इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका भलतीच लोकप्रिय आहे. महिलाच नव्हे तर अनेक घरात पुरुषही या मालिकेचे चाहते आहे. कर्तव्यतत्पर सून, बायको, आई, कुटुंबासाठी काहीही करणारी ते आता स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वतःची मतं ठामपणे मांडणारी अरुंधती सगळ्यांनाच भावते. आशुतोषसोबत लग्न करण्याचा तिचा निर्णय काहींना भावला काहींना आवडला नाही. मात्र, तरीही तिच्यावरचे प्रेक्षकांचे प्रेम काही कमी होताना दिसत नाही. मालिकेतील अरुंधतीच्या आयुष्यात अनिरुद्ध आणत असलेली संकटे सोडली तर सारे काही आलबेल आहे. मात्र, अरुंधतीच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या काही आलबेल नाही. ती घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत.
खऱ्या आयुष्यातही अरुंधती तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांच्यापासून विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून दोघांच्या नात्यांमध्ये काहीतरी बिनसल्याचे म्हटले जात आहे.अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने पती प्रमोद प्रभुलकर याला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. तर सोशल मीडियावर दोघांनीही केवळ मुलीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तर, काहीच दिवसांपूर्वी मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने पतीसोबत सुरू केलेली ‘मिरॅकल अभिनय अकादमी’ देखील सोडण्याचा निर्णय घेत या संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तिने प्रमोदशी संलग्नित सगळे प्रोजेक्ट्स देखील सोडले आहेत. त्यामुळे आता या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
प्रसिद्धी माध्यमातील चर्चांनुसार, मधुराणी आणि प्रमोद यांच्या नात्यात काही महिन्यांपासून कुरबुरी सुरू आहेत. इतकंच नाही तर, मधुराणी प्रमोदपासून वेगळं होण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मधुराणी नुकतीच परदेशवारी करून भारतात परतली. या ट्रीपमध्ये प्रमोद कुठेच दिसला नाही. तर ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलियाला गेली होती.
मधुराणीकडून काहीही प्रतिक्रिया नाही
मधुराणी गोखले-प्रभुलकर घटस्फोट घेणार का, यावर अद्याप तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चाहते आता तिच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.
आम्ही एकत्रच
आम्ही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचं प्रमोद प्रभुलकर यांनी म्हटलं आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रमोद प्रभुलकर यांनी मौन सोडलं आहे. या चर्चांना काहीच अर्थ नसून त्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा या खोट्या आहेत. आम्ही दोघंही एकत्र आहोत, आनंदी आहोत, असं प्रमोद प्रभुलकर यांनी एका संकेतस्थळाला सांगितले आहे. सोशल मीडियावर आमचे फोटो नसणं याचा अर्थ आमच्या नात्यात काही प्रॉब्लेम्स आहेत, असं होतं नाही, असंही प्रभुलकर यांनी स्पष्ट केलंय.
https://www.instagram.com/p/CuD–HNtJ_r/?utm_source=ig_web_copy_link