इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर अलीकडे सातत्याने चर्चेत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे तिचे पती आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. समीर वानखेडेंवर होणारे आरोप आणि त्याला सातत्याने उत्तर देणारी क्रांती ही अलीकडे माध्यमांमध्ये दिसत असते. मध्यंतरीच्या काळात अभिनयापासून फारकत घेतलेली क्रांती आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतते आहे. कलर्स मराठी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात क्रांती दिसणार आहे.
नवीन इनिंगला सुरुवात
क्रांती एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरून १ जुलैपासून प्रसारित होणाऱ्या एका रिऍलिटी कार्यक्रमात क्रांती परीक्षक म्हणून दिसणार आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात क्रांती परीक्षकाची असणार आहे. या कार्यक्रमात क्रांतीबरोबर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि दिग्दर्शक आभिजीत पानसे हे देखील परीक्षक म्हणून दिसणार आहेत.
इंस्टाग्राम पोस्टने दिली माहिती
क्रांतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. तिनं व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, ‘महामंच सज्ज होतोय लावणीचा!! सन्मान लावणीचा… अभिमान महाराष्ट्राचा!!पहा ‘ ढोलकीच्या तालावर’ १ जुलैपासून, शनि-रवि, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही’ असं लिहिलं आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ या नावावरूनच ही स्पर्धा लावणी या नृत्यप्रकारावर आधारित आहे. क्रांतीला आता परीक्षकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
दमदार कारकीर्द
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. जत्रा, खो खो, ट्रकभर स्वप्न, शिक्षणाच्या आईचा घो या मराठी तसंच गंगाजल या हिंदी सिनेमातही क्रांतीनं काम करत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच क्रांतीनं दिग्दर्शनही केलं आहे. ‘कांकण’ या सिनेमाचं दिग्दर्शन क्रांतीनं केलं असून आणखी एक सिनेमा ती दिग्दर्शित करत आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून क्रांतीनं तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Marathi Actress Kranti Redkar Reentry on TV Show