इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या स्पष्ट आणि परखड विचारांमुळे ख्यात आहे. बाई, ब्रा आणि बुब्स ही तिची पोस्ट प्रचंड चर्चेची ठरली. महिलांचे अनेक मुद्दे थेटपणे ती मांडत असते. अनेक जण तिच्या विचारांचे समर्थन करतात तर काही जण तिच्यावर जोरदार टीकाही करतात. बिनधास्त असलेल्या हेमांगीने वटसावित्री पौर्णिमेची एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे तिने स्पष्ट केले आहे की, तिने ही पौर्णिमा कशी साजरी केली.
हेमांगी तिच्या पोस्टमध्ये म्हणते की,
काल #वटपौर्णिमा होती.
परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते. मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!
थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं,
”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”. त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला.
त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!
मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!”
Hehe!
#कवीहुँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman
त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी!
https://www.facebook.com/100000289144138/posts/pfbid0tE1FtpMqqufrKVEUmHZsk3FRth5F9TBuGH4jD9RzSK5XRaQhVCdtaiv7y2G9kyUZl/?mibextid=Nif5oz
Marathi Actress Hemangi Kavi Vat Paurnima Post