गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ही मराठी अभिनेत्री करतेय शेतामध्ये काम; व्हिडिओ व्हायरल

by India Darpan
एप्रिल 9, 2023 | 5:15 am
in मनोरंजन
0
Capture 5

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या चाहत्यांच्या अत्यंत जवळचे असतात. त्यांच्या प्रत्येक व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील अपडेट्स त्यांच्या चाहत्यांना असतात. त्यामुळेच या कलाकारांना ते सामाजिक भान पाळावे लागते. याशिवाय हे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कसे वागतात यावरही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते. त्यामुळेच एखाद्या कलाकाराने केलेल्या चांगल्या गोष्टीचे प्रेक्षक, चाहते तोंड भरून कौतुक करतात आणि कलाकार चुकला तर त्याला सोशल मीडियावर सुनावतात देखील. असेच काहीसे या अभिनेत्रीबाबत घडले आहे.

छोट्या पडद्यावरील कलाकार अभिनेत्री अश्विनी महांगडे ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत काम करते. मालिकेतील अनघा हे पात्र अभिनेत्री अश्विनी महांगडे साकारते आहे. अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून तो खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवरून अश्विनी प्रेक्षक आणि तिच्या चाहत्यांमध्ये अजूनच लोकप्रिय झाली आहे. यावरून तिचे कौतुक होत आहे.

या व्हिडिओमध्ये अश्विनी शेतात काम करताना दिसत आहे. ज्वारी काढण्याचं काम सुरू आहे आणि तिथे ती ज्वारीची कणसं मशिनमध्ये टाकून नंतर पोत्यात भरण्यासाठी मदत करताना दिसते आहे. या व्हिडिओसोबत तिने एक कॅप्शनही टाकलं आहे. “रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी. जगाचा पोशिंदा : बळीराजा कोणताच राजकारणी किंवा यंत्रणा शेतकर्‍याला जगवत नसते तर शेतकरीच या सर्वांना जगवत असतो आणि हेच ऊन, वारा पावसासारखे शाश्वत सत्य आहे.
ईडा पीडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे.
मी घातलेला शर्ट माझ्या वडिलांचा (नानांचा) आहे. नानांची मायेची ऊब, आम्हा सगळ्यांचे ऊन, वारा, पाऊस, आलेली संकटं यापासून कायम रक्षण केले त्याची जाणीव मनात कायम आहे,”
असं कॅप्शन अश्विनीने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. नेटकर्यांनी तिच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. आदर्श आहात ताई तुम्ही… त्या सर्वांसाठी, जे थोडीशी हवा लागताच आपली माती, आपली संस्कृती विसरतात… शेतकरी राजाला त्याचा हक्काचा मान,’ ‘ही असतात शेतकऱ्यांची पोरं/पोरी.. कितीही मोठे झाले तरी मातीशी नाळ कायम,” एका युझरने किती पोटी झाली असा प्रश्न विचारला त्यावर दिलखुलासपणे साडेतीन पोटी असं उत्तर देखील अश्विनीने दिलं आहे. तुझ्यासारखी सेलिब्रिटी आम्ही पहिली नाही, हिच्यात जराही इगो नाही सगळ्यांना तू समजून आपलंस करून घेतेस ताई अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

Marathi actress Ashwini Mahangade Farm Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतातील जमीन मोजणीचा असा आहे रंजक इतिहास… शिवाजी महाराजांच्या काळात ही होती अनोखी पद्धत…

Next Post

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री गंभीर आजाराने त्रस्त…. चाहत्यांना केले हे आवाहन

India Darpan

Next Post
EtjIamTVgAEnRuo

'ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री गंभीर आजाराने त्रस्त.... चाहत्यांना केले हे आवाहन

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011