इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री अन्विता फलटणकरला छोट्या पडद्याने एक ओळख मिळवून दिली. छोट्या पडद्यावरील तिची ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सुपरहिट ठरली. या मालिकेमधील अन्विताच्या स्वीटू या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. थोडी लठ्ठ तरीही गोड असलेली स्वीटू सगळ्याच प्रेक्षकांना भावली. हे पात्र अभिनेत्री अन्विता फलटणकरने साकारलं.
सोशल मीडियावर अन्विता नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी देखील ती चाहत्यांसोबत शेअर करते. अन्विता याआधी तिच्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलताना दिसली नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिचं एक सिक्रेट सांगितलं आहे. ‘येऊ कशी तशी’ नंतर अन्विता मालिकांमध्ये दिसत नाही. पण प्रेक्षक मात्र तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अन्विताला स्वीटू या भूमिकेमुळे खरी ओळख मिळाली. आज तिचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत.
‘इट्स मज्जा डॉट कॉम’ला अन्विताने नुकतीच एक मुलाखत दिली. अन्विता म्हणते, “तुम्हाल विचित्र वाटेल पण मला जेव्हा कोणताही विचार करायचा असतो, तेव्हा विचार मी बाथरूममध्ये असते. आंघोळ करतानाचा वेळ हा आपला असतो. मला कोणता निर्णय घ्यायचा असेल किंवा मला काही महत्त्वाचं ठरवायचं असेल तर ते मी बाथरूममध्ये ठरवते. बाथरूममध्येच निर्णय घेण्याची अन्विताची सवय आहे. याबाबत तिने मोकळेपणाने सांगितले आहे.
Marathi Actress Anvita Phaltankar Reveal Bathroom Secret
Entertainment