गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेता सुयश टिळकची पोस्ट चर्चेत; का असं काय आहे त्यात?

नोव्हेंबर 15, 2022 | 5:09 am
in मनोरंजन
0
Suyash Tilak

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचा चॉकलेट बॉय म्हणून सुयश टिळक प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून सहज – साधी भूमिका निभावणारा सुयश घराघरात लोकप्रिय झाला. अनेक चित्रपटात देखील सुयशने काम केले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सुयश ओळखला जातो. ‘जे मनात तोच ओठात’ असा स्वभाव असलेला सुयश आता आपल्या थेट बोलण्यामुळे चर्चेत आला आहे. आता मराठी सिनेमे चालवायचे की नाही असा थेट प्रश्न सुयशने उपस्थित केला आहे. याला कारणही तसेच आहे.

अभिनेता जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ सिनेमा यासाठी कारण ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठी चित्रपट हे उत्तम असतात. मनाला उभारी देणारे, मनातील भाव जागवणारे असतात, हे ‘गोदावरी’च्या कथेने पुन्हा एकदा दाखवून दिले. या चित्रपटाच्या शो ला अभिनेता सुयश टिळकने आवर्जून हजेरी लावली. हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने जितेंद्र जोशी याच्याबरोबर फोटो काढत या चित्रपटाबाबत पोस्ट इन्स्टावर टाकली आहे. अत्यंत भावपूर्ण आणि मनापासून लिहिलेली ही पोस्ट आहे.

सुयश आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘गोदावरी’ ही साध्या माणसांची साधी सरळ गोष्ट आहे. प्रवाहाबरोबर वाहताना आपण स्वतःला काही वेळा हरवून बसतो, प्रेम देणाऱ्यांना दुरावून बसतो. फार उशीर झालाय हे जाणवायच्या आत त्याची जाणीव झाली तर ठीक नाहीतर ही परंपरा चालू राहते. प्राजक्त देशमुख याचे लेखन अप्रतिम आहे. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी देखील अत्यंत समर्पक संगीत दिले आहे. निखिल महाजन सहज सुंदर दिग्दर्शन. विक्रम गोखले काकांना शतशः प्रणाम. त्यांच्यासारखा नट होणे नाही. नीना ताई, संजय मोने हे कमाल आहेतच पण विशेष कौतूक जितूचं. ज्यानं मला आयुष्यात लिहायला प्रेरित केलं. ज्याच्या सहवासात नेहमीच खूप काहीतरी छान कानावर पडतं. ज्याच्या कवितेतून आयुष्यात जपून ठेवावं असं काहीतरी मनावर रूजतं. कधी तो मित्र होतो कधी आपल्याहून लहान, अल्लड तर कधी मोठा भाऊ बनून मेन्टॉर होतो. अशा माझ्या अत्यंत लाडक्या माणसाने केलेला हा सिनेमा. जितेंद्र जोशी I love you तू फार कमाल आहेस आणि कलाकार म्हणून खूप खरा आहेस. गौरी (गौराक्का) तू किती कमाल काम केलं आहेस. सहज आणि सुंदर अभिनय. मोहित टाकळकर दादा आणि प्रियदर्शन जाधव तुम्ही नेहमीच प्रेमात पाडता. Teddy mourya बहुत ही बढीया (एक कान ईधर भी देना चाहीये था! हे वाक्य तर फारंच भिडतं.)

अशा वेगळ्या धाटणीचे उत्तम सिनेमे घडावेत, असं मला मनापासून वाटतं आणि आजूबाजूच्या गजबजाटात सुद्धा केवळ स्टार्स किंवा larger than life गोष्टींना प्राधान्य न देता साध्या आशय विषयाला प्राधान्य देणारे आणि तसे सिनेमे निर्माण करणाऱ्या सर्वांना माझा सलाम. आता मराठी सिनेमे चालवायचे की नाही हे प्रेक्षकांच्या हातात आहे. अलीकडच्या काळात “कशाला चित्रपटगृहात जायचं OTT वर आलं की बघू” अशी रड फक्त मराठी चित्रपटांबाबत जास्त ऐकायला/बघायला मिळते. यामुळे मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात. काही सिनेमे अपवाद. पण, यामुळे अलीकडच्या काळात आलेले अनेक दर्जेदार मराठी सिनेमे दुर्दैवाने चित्रपटगृहात फार काळ टिकले नाहीत, याचं दुःख वाटतं. महाराष्ट्रातच मराठी सिनेमे नाही चालले किंवा प्रेक्षकांनी ते हट्टानी नाही चालवले तर काय करणार!?! पण अश्या निर्मात्यांमुळे व अश्या चित्रपटांमुळे चांगलं काम करता येईल व बघता येईल अशी आशा वाटत राहते.

या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भूमिका मांडणारी अशी भलीमोठी पोस्ट सुयश टिळकने केली आहे. दरम्यान, गोदावरी चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. नदी आणि मानवी नाते संबंध यांची उत्तम गुंफण बांधत अभिनेता जितेंद्र जोशीचा ‘गोदावरी’ चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही गाजला. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. ‘जितूचे सर्वोत्तम काम’ असे म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तर प्रेक्षक आणि कलाकारांकडून चित्रपटाचे कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

Marathi Actor Suyash Tilak Post Viral
Godavari Film

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बॉलिवूडमध्ये अभिनयाला नाही, तर याला महत्त्व – अभिनेत्री राधिका आपटे

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा; या आहेत प्रमुख मागण्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
Anganwadi Karmachari Sevika

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा; या आहेत प्रमुख मागण्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011