मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड असो की मराठी चित्रपट सृष्टी यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या खासगी जीवनाबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते, त्यांच्या जीवनात चांगले की वाईट त्याची लगेच चर्चा सुरू होते, परंतु काहीवेळा त्या अफवा असतात, सध्या देखील एका कलाकाराच्या संदर्भात अशा अफवा पसरल्या आहेत. मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव (अक्कलवार) यांच्यात दुरावा निर्माण झाला असून त्यांनी घटस्फोट घेतल्याच्या किंवा घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले असताना अभिनेता सिद्धार्थ जाधवने या सगळ्यावर चांगलाच राग व्यक्त केला असून ‘सब कुछ ठिक है’ असं म्हणत यावर पडदा टाकला आहे.
सिद्धार्थ घटस्फोटाच्या चर्चेवर म्हणाला, ‘अशा अफवा कोण पसरवतं मला माहिती नाही. आम्ही दोघेही एकत्र आहोत आणि आमच्यामध्ये सगळं ठिक आहे’. मागच्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी वेगळं राहत असल्याचे सांगितले जात होते, यावर बोलताना सिद्धार्थनं ‘सबकुछ ठिक हैं’, असे म्हणत जास्त बोलण्यास नकार दिला.
सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने सोशल मीडियावरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवल्यानंतर ते दोघेही वेगळे घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तृप्ती हिने सोशल मीडियावर अक्कलवार हे तिचे माहेरचे आडनाव लावले आहे. सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र नुकतंच सिद्धार्थने एका वेबसाईटसोबत बोलताना या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्यात सर्व काही ठीक आहे’, असे तो म्हणाला.
गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये विवाह केला. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. तसेच सिद्धार्थ नुकताच दुबई ट्रिप करुन आला असून सिद्धार्थ मुली स्वरा आणि इरा यांच्याबरोबर दुबईला गेला होता. मुलींबरोबरचे फोटो देखील त्याने शेअर केले होते. मात्र याच पत्नी तृप्ती कुठेही दिसली नाही. ती का गेली नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आजही पडला आहे.
marathi actor siddhartha jadhav on wife trupti divorce entertainment