इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नुकताच प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता प्रसाद ओक हा आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. भूमिका कोणतीही असो प्रसाद त्या भूमिकेला न्याय देतो. सोशल मीडियावर देखील प्रसाद सक्रिय असतो. पत्नीसोबतचे व्हिडीओ ते नेहेमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर प्रसादने खुलासा केला आहे.
प्रसाद ओकला त्यांच्या पत्नीची म्हणजे मंजिरी ओकची साथ कायम मिळत असते. नुकतेच दोघे ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एकत्र आले होते. तेव्हा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दिवसाला किती रील्स बनवता या प्रश्नावर प्रसाद म्हणाला, नाही असं काही नाही आम्हा दोघांच्या आयडिया असतात. कधी तिला सुचतं कधी मला सुचतं, लोकांचं मनोरंजन करणं हा आपला धर्म आहे.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली.
प्रसादने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, “तुम्ही कितीही शिकला असाल, चौथी स्कॉलरशिप, सातवी स्कॉलरशिप, दहावी बोर्ड, १२ बोर्ड अमुक डिग्री तमुक डिग्री तरीही जेव्हा तुम्हाला कशातलं काही कळत नाही, असं म्हटलं जातं, तेव्हा सगळ्या डिग्र्या पाण्यात गेल्या आहेत, असं वाटतं. प्रसादचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे.
Marathi Actor Prasad Oak on Viral Reels