मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचा निधन झालं असून मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या मृत्यू मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या अभिनयानं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
रंगभूमीवरचा हसरा खेळता नट मनाला चटका लावून गेला. मराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी समोर येत असताना सर्वांना धक्का बसला आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील राहत्या घरी झाल्याची माहिती मिळल्याने मनोरंजन विश्वाला जास्त धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत.
अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी सिनेसृष्टीत मानानं आणि अभिमानानं मिरवावं असं व्यक्तीमत्व. त्याचं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनासह पुरस्कार जिंकले. त्यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाचा परिपूर्ण अविष्कार होता. त्यांचा अभिनय पाहणं, ही एक पर्वणी होती. त्यांचं जाणं म्हणजे रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण अश्या या खळखळू हसवणाऱ्या या अवलियाच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत.
इतकेच नव्हे तर प्रदीप पटवर्धन यांचे अनेक सिनेमे गाजले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा या सिनेमांनी तर लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मोरूची मावशी नाटक नाट्यरसिकांना खेचून तिकीटबारीवर खेचून आणलं. तर हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची.
भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं. एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालया पासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.
Marathi Actor Pradip Patwardhan Death