इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून मनोरंजन सृष्टीत येऊन, आपले पाय भक्कम रोवून उभे राहणे हे काही सोपे काम नाही. हा संघर्ष ज्यांना जमतो, झेपतो ते त्यातून तरून जातात आणि रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतात. अभिनेता भरत जाधव याने हा संघर्ष केला आहे आणि आज त्याचे स्थान काय आहे, हे तर आपण जाणतोच. तर अशा या सर्वांच्या लाडक्या भरतने मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. होय, हे खरं आहे. भरत मुंबई सोडून कोल्हापूरला स्थायिक झाला आहे.
मुलाखतीत भरत काय म्हणतो?
“मुंबई ही आता बिझनेस हब झाली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या वेगाशी जुळवून घेणे मला कठीण जात आहे. मुळात आता माझे वयही हातात नाही. त्यामुळे मला एवढी धावपळ झेपत नाही. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. त्यामुळे खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.” असेही भरत सांगतो.
Marathi actor Bharat Jadhav Shift in This City