मुंबई – राज्यातील सर्व सरकारी व खाजगी शाळांमध्ये पाचवी ते दहावीपर्यं मराठी विषय आता सक्तीचा असणार आहे. त्यासाठी शासनाने आज नवा शासन आदेश जारी केला आहे. अगोदरही असा आदेश काढला होता. पण, त्यात सक्तीचे नव्हते. आता या नव्या अध्यादेशामुळे इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय अनिवार्य असणार आहे. या कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयाचे दंडा होणार आहे.