मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? असा सवाल करत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला याविषयी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, ते सांगतात की, आम्ही आदेश दिले नाहीत. मग प्रशासन चालतं कसं? सरकार कसं चालतं हे राज्यपालांनी त्यांना शिकवावं. समिती नेमतील, एखादा अधिकाऱ्याला निलंबित करतील. लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ही भेट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, सुनील प्रभू आणि इतर नेते उपस्थित होते. या भेटीत राज्यपाल रमेश बैस यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे माफी मागितली. माफी मागून चालणार नाही, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ला प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करा अशी मागणी त्यांनी यावेळी केले. लाठी चार्ज करण्याचे आदेश कोणी दिले. पोलीस अधिकारी जर त्यात दोषी असतील तर कारवाई करा असेही ते म्हणाले.
Who is the real General Dyer of Jalna incident? Aditya Thackeray’s question after the Governor’s visit
Maratha Reservation Lathi Charge Thackeray Group Governor Meet