मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर राज्यात सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुका लक्षात घेता सरकारला तातडीने दखल घेऊन मराठा समाजाचा असंतोष शमवण्याची आवश्यकता होती. अशात सरकारने एका निर्णयासाठी आज (सोमवार) एक तडकाफडकी बैठक बोलावली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित विशेष पत्रकार परिषद घेत या निर्णयांची माहिती दिली आहे.
बघा या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीमार केला होता. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना गृह विभागाने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे कळते. दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचा निवडणुकीवर दुष्परिणाम होऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यासाठी सरकार सरसावले आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची बैठक येत्या मंगळवारी मंत्रालयात होत आहे. ही बैठक घेऊन मराठा समाजाचे पेटलेले आंदोलन शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ हे मुद्दे या समितीच्या बैठकीत चर्चेला येणार आहेत.
तडकाफडकी बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा समाजाला कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन केली होती. जालना जिल्ह्यात झालेल्या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीची तडकाफडकी बैठक सरकारने बोलावली आहे.
Maratha Reservation Chief Minister Called Meeting
Today