बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यात मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी निषेधासाठी मोर्चे, बंद तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. काल संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावाच्या सरपंचाने आपली कार जाळल्याची घटना समोर आली. तर आता बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामस्थांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही अशी शपथ घेलल्याचे समोर आले आहे.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळे या समाजातून राजकीय पक्षांवरही रोष व्यक्त केला जात आहे. त्यात भाजपला जास्त विरोध बघायला मिळत आहे. केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे हा रोष आहे. आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो अशी ग्रामस्थांची भावना आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाहीत अशी शपथच बेलवाडी येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. या शपथेची चर्चा आता राज्यभर सुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजपची चिंता वाढली आहे.
बेलवाडी ग्रामस्थांनी सांगितले की, आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्र सरकार ५० टक्क्यांच्या वरची मर्यादा आरक्षणाने ओलांडली आहे त्यामुळे जे काही आरक्षण आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी कायद्यात जो बदल करावा लागतो तो केंद्र सरकार करु शकते. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने हा बदल करुन आम्हाला आरक्षण द्यावे. तर यावेळी एका जेष्ठांनी सांगितले की, भाजप सरकार आरक्षण देणार नसेल तर यापुढे आम्ही त्यांना मराठा समाज म्हणून मतदान करणार नाही. आमच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांना निश्चित मतदान करु. जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्हाला वाटेल त्या पक्षाला मत देऊ पण भाजपला देणार नाही, अशी शपथ या ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे त्याची राज्यभर चर्चा होत आहे.
Villagers of Beed’s Belwadi
Maratha Reservation Beed Village Pledge No Voting BJP Gramsabha