नवी दिल्ली – मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे मराठा आरक्षणाला धक्का बसला आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत ही याचिका दाखल केली होती. पुनर्विचार करण्याची गरज नाही असेही ही याचिका फेटाळतांना सुप्रीम कोर्टाने स्पष्टं केले आहे. ही याचिका फेटाळल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न केंद्राकडे गेला आहे.
सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई देणारे विनोद पाटील यांनी सांगितले की आता हा निर्णय पूर्णपणे केंद्राकडे गेला आहे. तर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केंद्राकडे अधिकार गेल्याचे सांगितले. मराठा आरक्षणा विरोधात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, कायद्यापुढे काही चालत नाही.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे गेले काही दिवस आरक्षणाचा अधिकार केंद्राकडे की राज्याकडे हा प्रश्न सर्वांसमोर होता. त्यावरुन वादही सुरु होता. पण, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे हे अधिकार केंद्राकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.