जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पालघाटा येथे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःची कार पेटवून दिली. याअगोदर ते विहीर अनुदान घोटाळयाचे प्रकरण उघड करतांना केलेल्या आंदोलनामुळे चर्चेत आले होते. त्यावेळेस त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळून करून आंदोलन केले होते. या घटनेचा व्हिडिओही सर्वत्र व्हायरला झाला. आताही त्यांनी कार जाळल्यानंतरचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
मंगेश साबळे हे नेहमी अनोखे आंदोलन करुन सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधत असतात. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता त्यांनी स्वतःच्याच कारला इंधन ओतून पेटवून दिले. त्यानंतर त्यांच्या या निषेधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास साबळे यांनी पाल फाटा येथे रस्त्यावर आपली कार उभी केली. त्यानंतर या कारला त्यांनी पेटवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन निषेध केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सरपंच मंगेश साबळे यांना ताब्यात घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडून दिले. रस्त्यावरील पेटवलेली कार बाजूलाच करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून देण्यात आली देण्यात आली आहे.
The sarpanch set his own car on fire in Jalna to protest the lathi-charge on the protesters
Maratha Protest Sarpanch Fire Burn New Own Car Video Viral