मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक काल रात्री पार पडली. या बैठकीत या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चकार शब्दही काढण्यात आला नाही. बैठकीला उपस्थित असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समन्वयकांना तसे बजावले होते. त्यामुळे सरकारने संभाजीराजे छत्रपती यांनाही मॅनेज केल्याचे दिसत आहे, असा खळबळजनक आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे.
गेल्या महिनाभरात राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्यातील अनेक घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मराठा समाजाच्या रखडलेल्या अनेक मागण्या असतानाच मराठा क्रांती मोर्चा आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये बेबनाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अग्रेसर होत अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली.
दरम्यानच्या काळात शरद पवारांपासून ते नितीन गडकरी यासारख्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देऊन मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आल्या होत्या.
मागण्या मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच आता मात्र मराठी क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांमध्ये दरी पडल्याचे चित्र समोर येत आहे. कारण या समन्वयकांनी गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं की, कोणीही मध्ये काही बोललं किंवा काही विचारलं, तर मी बैठकीतून निघून जाईन. इतर काहीजणही तीच भाषा बोलत होते. त्यामुळे या बैठकीचे एकूण स्वरुप पूर्वनियोजित किंवा मॅनेज केल्यासारखे दिसत होते. कोणाच्या तरी राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाला वेठीस धरले जाऊ नये. ही बैठक मराठा आरक्षणासाठी बोलावली होती, पण आरक्षणावर एका वाक्याचीही चर्चा झाली नाही. या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध केला जात आहे, असे मराठा समन्वयकांनी म्हटले आहे.
मराठी क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक झाला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीप्रसंगी संभाजीराजे यांनी दमदाटी केल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयक यांच्यातील वाद रंगण्याची चिन्हं दिसून येत आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून दमदाटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापणार असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा चालू असतानाच मुंबईतील बैठकीत संभाजी राजे यांनी दमदाटी केल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी चाललेल्या या क्रांती मोर्चाच्या भूमिकेकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठा समाजाच्या अनेक मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे काम सुरु असतानाच हा वाद आता उफाळून आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या मागण्याबाबत चर्चा चालू असताना संभाजीराजे यांनी या बैठकीत काही बोलू दिले नाही, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबईतील बैठकीत संभाजीराजेंनी कुणी काही बोलले तर बैठकीतून निघून जाण्याची धमकी दिली होती असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे हे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटले असल्याचे दिसत आहे.
राज्यातील मराठा समाजाच्या अनेक मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मोर्चा, आंदोलनं आणि निषेध करुन मराठा समाजाच्या मागण्या सरकारकडून मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत संभाजीराजे बोलू देत नाहीत तसेच छत्रपती संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चा संपवत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात येत आहे.
मराठा समाजाची बैठक बोलवली तर शेवटच्या घटकालाही बोलता आलं पाहिजे, अशा शब्दांत ‘शिवछत्रपती’ संघटनेचे नेते अमर देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला होता. सह्याद्री अतिथीगृहावरील गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे अनेक समन्वयक नाराज आहेत. भाजपाशी जवळीक असणाऱ्या नेत्यांनाच बोलण्याची संधी देण्यात आली. इतरांना बोलू दिले नाही, असा आरोप अमर देशमुख यांनी केला आहे.
Maratha Kranti Morcha and Chhatrapati Sambhajiraje Dispute