मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.
आधी हे अधिवेशन २ आणि ३ जुलै रोजी घेण्याचे जाहीर झाले होते. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. एक दिवस उशीराने अधिवेशन सुरू होणार आहे. एक दिवसाने अधिवेशन पुढे का ढकलले याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
Marahastra Assembly Special session 1 day postponed