इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या भरतीचा सराव मुले करत होती. मात्र भरतीबद्दल सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. पण, आता त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय़ घेण्यात आले.
- महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीस मंजुरी. (गृह विभाग)
- राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
(अन्न, नागरी पुरवठा विभाग)
-सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय.
(सामान्य प्रशासन विभाग, [विमानचालन])
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस 5 वर्षांसाठी मुदतवाढ.
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)